Sun, 19 Jan 2020
Contact No: +91 9000305252

कामजीवनातील नियमितपणा

कामजीवनातील नियमितपणा
Jun 22, 2019

चाळीशीनंतर कामजीवनात तारुण्याच्या काळाप्रमाणे नियमितपणा राहत नाही. जसजसा सेक्समध्ये खंड पडतो, तसतसे कामजीवनही विस्कळीत होत जाते. त्यातून काही लैंगिक समस्याची बीजे पेरली जातात. त्यामुळे परत कामजीवनात खंड पडतो. अशा रीतीने एक दुष्टचक्रच सुरु होते. चाळीशीनंतरच्या जीवनात कामजीवन सुरळीतपणे व नियमितपणे सुरु राहण्यासाठी चाळीशीपूर्वीच तसे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सेक्स पहिल्यापासून नियमित ठेवले गेले तर पुष्कळ गोष्टी सुलभ होत जातात. त्याला शरीरशास्त्रीय  कारणे जशी आहेत तशी मानसिक कारणे पण आहेत.

सर्वप्रथम नियमित सेक्समुळे शरीरातील आॅक्सीटोसीन या महत्वाच्या हाॅर्मोनची निर्मिती व त्याचे शरीरभर अभिसरण नियमितपणे होत रहाते. त्याचे विधायक परिणाम निश्चितच होत रहातात. आॅक्साटोसीन हे रसायन कामेच्छेच्या वेळी मेंदूमध्ये  हायपोथॅलॅमस येथे निर्माण होते. त्यातून ते रक्ताद्वारे लैंगिक अवयवांकडे जाते. तेथे त्याच्या प्रभावाने नायट्रीक आॅक्साईट सिन्थेज या रसायनाने नायट्रीक आॅक्साईड तयार होते. त्यामुळे लिंगातील रक्तपुरवठा वाढून ताठरता येते. परंतु आॅक्सीटोसीनचा परिणाम एवढाच नसून त्याचे मानसिक परिणाम पुरुषाला सामाजिक व व्यक्तिगत आत्मविश्वास देऊन आयुष्यात रोमॅन्टीक दृष्टिकोन ठेवायला मदत करतात. अशा रोमॅन्टीक दृष्टिकोनामुळे मानसिक ताणतणाव कमी होतात. दांपत्यजीवनात सौहार्द निर्माण होते. पतीपत्नींची जवळीक संसारात गोडी निर्माण करते.

नियमित वीर्य पतनाने पुरुषाच्या सेक्स हाॅर्मोनच निर्मिती व्यवस्थित होत रहाते. त्याच्या प्रोस्टेट ग्रंथीचे काय नीट होत रहाते. त्यामुळे चाळीशीनंतर विशेषतः पन्नाशीपुढे होणारे प्रोस्टेट ग्रंथीचे अकार्यक्षमतेमुळे होणारे विकार टाळता येतात. यामध्ये  बिनाईन प्रोस्टॅटीक एन्लार्जमेंट सारखे विकार व त्यामुळे होणारे मूत्रविकार टाळता येतात.

पुरुषामध्ये जसे प्रोस्टेटचे विकार टाळता येतात, तसे स्त्रीमध्ये  नियमित सेक्स केल्याने ओव्हरींचे सेक्सविषयीचे कार्य व्यवस्थित चालू राहून सिस्टीक ओव्हरीसारखे विकार टळू शकतात. नियमित इस्ट्रोजेन हाॅर्मोनची निर्मिती होत असल्याने योनीमार्गाचा ओलसरपणा सेक्सच्या वेळी येत राहतो. शरीरावर तारुण्याची झळाळी दिसू लागते. नियमित सेक्स हे नैसर्गिक हाॅर्मोन थेरपी करणारे असून स्त्री व पुरुष या दोघांनाही त्यांचा सदुपयोग होतो.

सेक्सच्या आॅरगॅजमच्या वेळी मेंदूतील न्यूक्लिअस अॅक्यूम्बन्स या भागात एन्डाॅर्फीन व ओपिएट सारखी रसायने स्फोटाद्वारे निर्माण होतात. त्यामुळे मनःशांतीचा अनुभव येतो. मानसिक ताण निर्माण करणारी अॅड्रेनॅलीन व स्टेराॅईड्ससारख्या रसायनांचे परिणाम यांनी कमी होतात. त्यामुळे मानसिक ताणामुळे दिसून येणारे अकाली वृध्दत्व टळण्यास मदत होते.

कामसंबंधात तोचतोचपणा येऊ नये म्हणून दांपतुलाने पुरेपूर काळजी घेणे आवव्यक आहे. त्यासाठी त्यामध्ये विविधता आणून त्यात नाविन्य उपभोगणे महत्वाचे आहे. ही विविधता कामसंबंधात नसेल तर नेहमीच्या जोडीदाराबरोबरील रतीविलास दोघांनाही कंटाळवाणा होतो. त्यामुळे पुरुष जर कामसंयम पाळू शकला नाही तर विवाह-बाह्य संबंधात गुरफटू शकतो व दांपत्य जीवनात त्याचे पडसाद उमटून गढूळपणा येतो.

म्हणून रुटीन, कंटाळवाण्या व नीरस कामजीवनाला कामय्संजीवनी देण्यासाठी कामनाविण्याचा वापर अत्यावश्यक  आहे. यासाठी कामसंबंधाची जागा, वेळ, तंत्र व कामासने यांच्यातील साध्या बदलांनी सुध्या ही कामविविधता निर्माण करुन दांपत्याने कामानंद उपभोगला पाहिजे.

कामजीवन म्हणजे योनी-मैथुनच हा विचारच मनातून काढून इतर पकारच्या मैथुन क्रिया असतात हे ध्यानात ठेवावे. त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करुन त्यांच्या रसिकतेने वापर केल्यास दोघांनाही वेगळा आनंद मिळू शकतो. नेहमीच्या जोडीदाराबरोबर हे मैथुन-पकार केल्यास एड्स अथवा अन्य गुप्तरोगाची अजिबात लागण होण्याची शक्यता नसते. कामसंबंधात कधी आपण तर कधी जोडीदाराने आक्रमक बनावे त्यामुळे हा खेळ उत्तम प्रकारे रंगू शकतो.

प्रसंगानुरुप विविध मैथुन पकार करुन सुध्या मरगळलेल्या कामजीवनात नवचैतन्य  येते. यामध्ये जोडीदाराकडून केलेले हस्तमैथुन, मुखमैथुन, स्तनमैथुन व जघनमैथुन यांचा समावेश होतो.

हस्तमैथुन

जोडीदाराकडून हस्तमैथुन करुन घेताना तिच्याशी शृंगार करीत ते करावे. शक्य असल्यास कामस्वप्नरंजनाचा वापर करावा. अशावेळी कधी कधी कामस्वप्ने एकमेकांना कथन केल्यास हस्तमैथुनाचा आनंद निश्चितच वाढतो. स्त्री -पुरुषांनी एकमेकांना एकाचवेळी हस्तमैथुन केल्यास तो कामानंद आगळाच असतो.

मुखमैथुन

लैंगिक आरोग्य व स्वच्छता पाळून जेव्हा पुरुष स्त्रीला किंवा स्त्री पुरुषाला स्वतःच्या तोंडाने लैंगिक अवयवांची उत्तेजना देतो. तेव्हा एक आगळा वेगळा आनंद दोघांनाही मिळत असतो. दांपत्याने मोकळ्या मनाने व कुठल्याही प्रकारची भीती किंवा तिटकारा मनात न ठेवता हा आनंद घ्यावा. यामुळे निर्माण होत असलेल्या आपुलकीच्या भावनेमुळे दांपत्याच्या कामजीवनाचा स्तर उंचावला जातो.

जघन-मैथुन

यामध्ये पुरुष स्त्रीच्या जघन भागात म्हणजेच मांड्यांतील आतील भाग व प्यूबिक हाड यांच्यामुळे निर्माण होत असलेल्या पोकळीसारख्या  भागात लिंग घालून दोहन करतो. यावेळी स्त्री तिच्या दोन्ही मांड्या लिंगाभोवती घट्ट दाबून धरते. त्यामुळे पुरुषाला लिंगाचा प्रत्यक्ष योनीप्रवेश न करताही आवळपणा मिळून कामोत्तेजना होते. तसेच स्त्रीच्या योनीद्वारावरुन हे घर्षण होत असते. स्त्री तरी योनीमैथुनाला कंटाळली असली तरी स्वतःला फारसे शारीरिक कष्ट न घेता पुरुषाची कामपूर्ती जघन-मैथुनाने करु शकते. एवढेच नाही तर कधी कधी तिच्या मदनध्वजाचे पण उत्तेजन या प्रकारात होऊ शकते.

स्तनमैथुन

स्तनमैथुनाचे भाग्य  काही काही पुरुषांनाच मिळते. आपल्या पत्नीचे मदनकुंभ पुरेसे उन्नत असल्यास त्यांच्या घळीमध्ये पती उत्तेजित लिंग ठेवून त्याच्या भोवती ते मदनकुंभ आवळून धरुन कृत्रिमरीत्या  योनीमार्गाचा आभास करु शकतो. त्यानंतर दोहन क्रिया करुन त्या आकुंचित घळीमध्ये  वीर्यपतन करणे सुद्धा पुरुषाला आनंददायी वाटते.

सेक्स हा दांपत्यातील सुखद शारीरिक संवाद असतो. नियमित सेक्समुळे दोघांमधील व्यक्तीसंबंध सुधारतातच, परंतु संसारावरही विधायक परिणाम होत असतो. सेक्स हा एक आनंद-सोहळा मानून जेव्हा दांपत्याकडून केला जातो तेव्हा ती एक मैफल बनते आणि तिचा रसास्वाद हा अवर्णनीय ठरतो.

0 Comments

Post Comments