Thu, 02 Apr 2020
Contact No: +91 9000305252

राजे महाराजे आणि नवाबांच्या ऐशोआरामासाठी ’हरम‘

राजे महाराजे आणि नवाबांच्या ऐशोआरामासाठी ’हरम‘
Jun 22, 2019

वैदिक युग आणि पौराणिक काळात स्त्रियांना पुरूषांसमान स्वतंत्र होते आणि कोणत्याही पुरूषाबरोबर सेक्स करायला तिच्या इच्छेला महत्व दिले जात होते. परंतु त्या नंतरच्या काळात आपण आज ज्याला मध्यकाळ म्हणून ओळखतो स्त्रीची स्वाधीनता हळूहळू तिच्यापासून हिसकावून घेतली गेली आणि ती पुरूषासारखे म्हणजे राजे महाराजे नवाब बादशहा जमीनदार इत्यादींच्या इशाऱ्यावर  नाचू लागली. हेच कारण आहे की या काळात स्त्रियांचे सर्वात जास्त शोषण होते सुरू झाले आहे. आणि शोषणाची ही प्रवृत्ती आधुनिक काळापर्यत चालत आली आहे.

आता याला स्त्री जातीचे शोषणाची परिकाष्ठा म्हणावी लागेल मध्यकाळात पुरूष इतका शक्तीशाली झाला आहे की तो एकावेळी अनेक लग्न करू लागला आहे. अनेक स्त्रीच्या रखैलम्हणून ठेवू लागला आहे. आणि वेळोवेळी मजामस्ती करण्यासाठी वेश्याचा एक वेगळा वर्ग तर होताच.

मोठमोठ्या राजे महाराजे किंवा नवाबाच्या ऐशोरामासाठी शेकडो सुंदर तरूणी हरम मध्ये कैदी सारख जीवण जगायला लाचार झाल्या होत्या. त्यामध्ये  काही तरूणी तर अशा होत्या की त्यांना एका दिवसापेक्षा जास्त शरीरसुख मिळाले नाही आणि जीवणभर त्या पुरूषाच्या सहवासासाठी तडफडत राहिल्या. त्यात मजेची गोष्ट म्हणजे राजा किंवा नवाब तर रोजच आपल्या साठी मुलगी बदलत असे. पण मुलीचीइच्छा असूनही ती एक प्रेम करू शकत नव्हती.

हरमोमध्ये राहणाऱ्या या शेकडो मुलींवर कडक पहारा असायचा त्यांना बाहेर पुरूषांना भेटण्यास परवानगी नव्हती. काही सुलतांनानी आपल्या हरमच्या पहारा करण्यासाठी हिजडे ठेवले होते. कारण की हरम मधील मुली त्याच्या बरोबर संबध ठेवू शकत नाही. जर यात एखाद्या मुलीवर शंका आली तर तिची मान उडविली जात असे यामुळे हरम मधील सर्व स्त्रियांच्या मनात भिती असायची. ह्या जमान्यातील लेखक आणि कविंनी सुध्दा पुरूषांच्या तुलनेत स्त्रियाबद्दल कमीपणा दाबण्यात काही कसर सोडली नाही. मध्यकाळात पतिच्या निधनानंतर स्त्रियांच्या सती जाण्याची प्रथा चालू होती. त्यामागे सुध्दा शक्तीशाली पुरूष वर्ग होता कारण त्यातत त्यांचा स्वार्थ होता. कारण असे की तरूण विधवेला जिवंत ठेवण्याचा हक्क दिले तर ती कधी ना कधी पुन्हा लग्नाचा हक्क मागेल म्हणूनच विधवेला जिवंत न ठेवता आणि मजामस्ती साठी कुमारी मुली तर आहेतच.

अशापकारे पुरूष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे मापदंडाचा कार्यक्रम सुरू झाला तो मध्यकाळामुळेच आणि त्याच वेळेस जन्म मनु महाराज ने स्त्रियासाठी एक नवी आचार संहीता बनविली. नंतर त्यांनी स्त्रियांची निंदा करतांना अनेक श्लोक लिहीले आहे.

जसे पतीला हा अभिमान नसावा कि मी सुंदर आहे किंवा मी तरूण आहे कारण स्त्रीया रूप पाहात नाही वय पाहात नाहीत सुरूप असो किंवा कुरूप असो स्त्रिया पुरूषांचे अभिगमन करतात.

असे म्हणतात की प्रत्येक क्रियाची उलटी प्रतीक्रिया होते. याच नियमानुसार मध्यकाळात ज्या स्त्रियांना बंदी बनवून ठेवले होते आणि त्यांना जेंव्हा संधी मिळाली तेंव्हा त्या विलासीनी झाल्या. याचे उदाहरण म्हणजे बेगम समरू नावाची स्त्री आहे. जी सुरवातीला हरम मध्ये आणली गेली होती. ती एक साधारण मुलगी होती. तिला बादशहा ने आपल्या इंग्रज मित्राला भेट दिली होती.. नंतर जसजसे बेगम समरूच्या हातात सर्व कारभार आला तेंव्हा तिने नवे -नवे मुले आपल्या सेवेसाठी ठेवले आणि त्यांच्याकडूनच ती शरीराची भूक भागवित असे. याच प्रमाणे इंग्रजाच्या काळात सुध्दा अनेक महाराण्या महाराजासारखे विलासीत पूर्ण जीवण जगू लागल्या होत्या आणि आपल्या शरीराची भूक मिटवण्यासाठी नवीन नवीन पध्दतीने देश विदेशात फिरत होत्या. दिवान जरमनी दासने अशा अनेक राण्या महाराण्याच्या काम चेष्टेचे वर्णण आपल्या महाराणी या पुस्तकात केले आहे. आणि वाचकांना हे वाचून आश्चर्य होईल की काही राण्या किंवा बेगम यांच्यात जेंव्हा वासना निर्माण होत होती तेंव्हा त्या खूप क्रूर व्यवहार करत असत तेंव्हा त्या पूर्णपणे निर्दयी बनून बदला घेत असे. खाली एक अशी सत्य घटना सांगत आहे की अशा प्रकारच्या घटना मुळे सर्व बेगम स्त्री जातीच्या नावावर कलंक होत्या. अस्तु पहिली जूनागडची बेगम होती तिचे आपल्या एका मैत्रिबरोबर समलैंगीक सेक्स संबंध होते. एके दिवशी जेंव्हा ती तिच्याबरोबर सेक्स संबंध करत होती तेंव्हा तिच्या एका तरूण नोकरानीने हि गोष्ट महालामधील सर्व नोकरांना सांगितली बेगमला जेंव्हा ही गोष्ट समजली की तिच्या नोकरानीने तिची बदनामी केली आहे तेंव्हा त्या नोकरानीचे हातपाय बांधून तिला मारहाण केली आणि तिला खूप त्रास दिला तेंव्हा तिची तडफडून मृत्यू  झाला. अशाप्रकारे राजा महाराजाच्या घरात खूप अनैतीक वातावरण होते.

0 Comments

Post Comments