Thu, 02 Apr 2020
Contact No: +91 9000305252

समाधानी कामजीवनासाठी

समाधानी कामजीवनासाठी
Jun 22, 2019

१.  संभोग ही दोन व्यक्तींच्या मीलनातून होणारी सत् (खरोखरच्या) व चित् (शुद्ध) आनंदाची अनुभूती आहे. धर्म व अर्थ या पुरुषार्थाबरोबर भारतीय तत्वज्ञान्यानी काम सुद्धा पुरुषार्थ मानला होता. सर्वसामान्याने या तिन्हीही पुरुषार्थांचा समतोल साधून आपले आयुष्य समाधानात घालवावे असे त्यांनी आग्रहाने सांगितले होते. म्हणून आपण अर्थार्जनावर दिवसातील किती वेळ देतो याचा विचार करुन कामजीवनाला तेवढेच महत्त्व देतो का याचा अंतमुर्ख होऊन विचार करावा.

 

२.  आपण आपल्या शरीरानेच ओळखले जातो. आपल्याला शरीरापलिकडील आनंदाचा अनुभव घेण्यासाठी सुद्धा आपल्या शरीराच्या माध्यमाचाच उपयोग करणे भाग असते. त्या शरीराच्या सेक्स सारख्या नैसर्गिक गरजांची योग्य पूर्तता आपणच केली नाही तर आपण आपल्या शरीरालाच नाकरल्यासारखे होईल.

 

३.  संभोगक्रियेमध्ये अंतिम क्षणापेक्षा तो क्षण येण्याअगोदरचा प्रवासच महत्वाचा असतो. यालाच संभोगपूर्व शृंगार (फोर प्ले) म्हणतात.

 

४.  संभोग ही स्पर्धा नसून अत्युच्च दर्जाचा खेळ आहे ज्या मध्ये खेळणारे दोन्हीही खेळाडू जिंकतात. दोन्हीही तुल्य बळ असतील तर हा खेळ फारच रंगतो.

 

५. संभोगक्रियेतील प्रवासातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यास शिका. यामध्ये संपूर्ण शरीरच उत्तेजित होत असते. तो आनंद अनुभवायचे सोडून आपल्या लैंगिक अवयवांच्या प्रतिसादाकडेच लक्ष केंद्रीत करण्याने त्या आनंदाला आपण मुकतो. एवढेच नव्हे तर मेंदूतील कामकेंद्राची होणारी उत्तेजनाही आपण गमावून लैंगिक प्रतिसादावर उलटाच परिणाम करुन घेतो.

 

६.  संभोगातील संबंधितांना आंनद देणारी कुठलीही क्रिया ही मूलतः विकृत नसून त्या संबंधीचे संबंधित व्यक्तींचे विचारच त्याला विकृत बनवते. प्राचीन हिंदू समाजातील कुठल्यान् कुठल्या घटकांकडून या प्रकारच्या क्रिया मान्य पावलेल्याच होत्या.

 

७.  दांपत्याने लैंगिक क्रियाविषयीची लाज व घृणा दूर करुन लैंगिकतेचे शरीरशास्त्र माहीत करुन घेतले पाहिजे. लैंगिक आरोग्य हे राखलेच पाहिजे. पुरुषाने लिंगावरील कातडी मागे करुन त्याखाली रोज जमणारा पांढरा स्त्राव (स्मेग्मा) हा दररोज साध्या  पाण्याने दूर केला पाहिजे. स्त्रीनेही तिच्या मदनध्वज (क्लायटाॅरीस) भागाजवळ जमणारा अशा पकारचा स्त्राव  दूर केला पाहिजे. त्यामुळे कामप्रतिसाद हा जास्त आनंददायक होतो. लैंगिक स्वच्छतेसाठी साबण, डेटाॅल व अन्य रसायनांचा वापर टाळावा. तो तेथील नाजूक त्वचेला हानिकारक ठरु शकतो.

 

८. संभोगपूर्व शृंगार हा अंगावर कपडे असतानाच सुरु करावा. वातावरण-निर्मिती ही त्या त्या व्यक्तींच्या आवडीवर अवलंबून असली तरी संगीत, टी. व्ही., व्हीडियो यांचा योग्य वापरही उपयुक्त होऊ शकतो. तसेच दांपत्यामधील मनमोकळा, वातावरण-पोषक

 

शृंगारिक संवाद शृंगारात रस निर्माण करु शकतो.

 

९. मनामध्ये जोडीदाराविषयी  राग, संताप, चीड ठेवून शृंगार करणे ही जोडीदाराला नसून स्वतःलाच शिक्षा असते हे लक्षात ठेवावे. कारण यातूनच शीघ्र वीर्यपतन व फ्रिजीडीटी या सारख्या लैंगिक समस्यांची  बीजे पेरली जातात. स्वतःच्याच कामपूर्तीचा विचार न करता जोडीदाराच्याही भावनांचा विचार केला पाहिजे व त्याचाही कामोच्च आनंद त्याला कसा मिळेल हे पाहिले पाहिजे.

 

१॰.  स्वतःच्या कामचक्राची स्वतः माहिती करुन घेऊन दररोज स्वतःचा कामप्रतिसाद स्वतः अनुभवायला शिकले पाहिजे. स्वतःच्या कामोच्च आनंदाची जबाबदारी ही जोडीदारावरच न टाकता स्वतः उचलली पाहिजे. विशेषतः स्त्रीने हे लक्षात ठेवले पाहिजे.

 

११.  मेंदूतील कामकेंद्रावर कामप्रतिसाद अवलंबून असतो. प्रत्य क्ष संभोग-क्रियेच्या वेळी उत्तेजित होणाऱ्या पंचेंद्रियांच्या  संवेदना सोडून हे कामकेंद्र फक्त कामस्वप्नांनीच (सेक्शुअल फॅण्टसी) उत्तेजित होत असते. म्हणून अशी कामस्वप्ने विकृती म्हणून दाबून न टाकता दांपत्याने त्याचा वारंवार उपयोग केल्यास कामजीवनातील एकसुरीपणा टळून निर्धोकपणे नाविन्य व रस निर्माण करता येईल.

 

१२.  सुसंवाद (कम्युनिकेशन) हे समाधानी दांपत्यजीवनाचे अत्यावश्यक अंग आहे. कामजीवनातील आपल्या अपेक्षा व विचार मनमोकळेपणे आपल्या जोडीदाराला सांगणे व त्यालाही त्याचे विचार सांगण्यास उद्युक्त करणे, यामुळेच सुसंवाद निर्माण होतो.

 

१३.  सेक्शुअल फॅन्टॅसी विकसित करुन प्रत्येकजणच आपापल्या कामविश्वात रमत असतो. स्त्री सुद्धा याला अपवाद नाही. अशी कामस्वप्ने विकसित करणे म्हणजे म्हणजे प्रत्यक्ष व्यभिचार करणे नाही. किंबहुना वेश्यागमन व लैंगिक गुन्हे करणारी व्यक्ती सेक्शुअल फॅन्टॅसी कलेमध्ये कमजोर असते.

 

१४. दांपत्यातील दोघांचा कामोच्च आनंदाचा क्षण एकाच वेळी येणे हे जास्त आनंद देत असले तरी ते तसे घडणे आवश्यकच असते असे नाही. कामकौशल्याची तंत्रे वापरुन जोडीदारालाही स्वतःच्या स्खलनानंतर आनंद देता येतो. म्हणून संभोगोत्तर विलासक्रीडा (आफ्टर प्ले) शिकली पाहिजे.

 

१५.  संभोगातील नीरसपणा दूर करण्यासाठी नवीन तंत्रे वापरली पाहिजेत. त्यात वेगवेगल्या वेळा, वेगवेगल्या जागा व वेगवेगळे संभोग प्रकार यांचा वापर सामंजस्याने केला पाहिजे.

0 Comments

Post Comments