Thu, 02 Apr 2020
Contact No: +91 9000305252

फायर फायटर ते स्त्री बनण्यासाठी २२ वर्षांचा संसार नोकरी व कौटुंबिक जीवनाचा त्याग

फायर फायटर ते स्त्री बनण्यासाठी २२ वर्षांचा संसार नोकरी व कौटुंबिक जीवनाचा त्याग
Jun 22, 2019

मार्क जोन्स हे ब्रिटिश फायर फायटर अग्निशामक दलात काम करतात.  त्यांचे २२ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे.  परंतु त्यांना दरवेळेला काम करताना वेगळाच न्यूनगंड येत होता.  स्वतःला दाखवण्यासाठी ते अग्नी सेवा दलात सामील झाले व एखादा पुरुष करतो तसेच मोठमोठ्या शिडीवर चढणे लोकांना गाडी मधून बाहेर काढणे व आगीला प्रतिकार करणे तसेच लोकांना आगी मधून बाहेर काढणे या गोष्टी ते करत होते.  पण त्यामध्ये कधीच त्यांना कामाबद्दल आपलेपणा वाटला नाही.  तरी ते स्टेशन प्रबंधक म्हणून कार्यरत होते तसेच त्यांना प्रिन्स चार्ल्सद्वारा पुरस्कारही देण्यात आला होता परंतु १८ महिन्यांपूर्वी त्यांनी एक असा निर्णय घेतला त्यामुळे त्यांना संतुष्टी वाटली.  त्यांनी  लग्नाच्या २२ वर्षांनंतर आपल्या घरच्यांना एकत्र बोलावून आपण लिंग बदलणार आहोत याची बायकोला आणि मुलांना कल्पना दिली.  यापुढे आपण स्त्री बनून या जगात वावरणार आहोत हे स्पष्ट केले त्यांनी आपल्या नोकरीतून सेवानिवृत्ती घेतली व १००  किलोमीटर वरील एका शहरांमध्ये जाऊन ते राहू लागले.  त्यांनी स्टेफनी हे नाव धारण करून एका महिलेचे जीवन जगू लागले स्टेफनी सांगते की मी काही महिन्यांमध्येच सर्वांचा त्याग केला परंतु माझ्या मनाची शांती साठी खूप चांगली होते कारण मी एका पुरुषाच्या देहामध्ये मी स्त्रीचे जीवन जगत होते व हे चुकीचे होते मी वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी शारीरिक बदल खूप जवळून बघितला.  माझी मनस्थिती व शारीरिक स्थिती खूपच कठीण होत गेली होती शेवटी माझ्या मुलांनी मला सर्वांच्या समोर बसवले व विचारले की आम्हाला काहीच हरकत नाहीये पण तुमचं आतून काय चाललंय हे तरी आम्हाला सांगा.  ज्यामुळे आम्हाला तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात येईल. मी त्यांना सांगितले की मला ट्रान्सजेंडर म्हणजेच माझं लिंगपरिवर्तन करायचा आहे व ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट नव्हती.  त्यांच्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती कारण मी आतून बदलली आहे मला पहिलेच कळले होते.  या गोष्टीनंतर  माझ्या पत्नीने मला घरातून हाकलून दिले व ती स्वतः दुसरीकडे जाऊन राहायला लागले व्यक्तीचे माझ्यावरती मला कुठलाच राग नाहीये परंतु माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दल खूप वाईट वाटते.  स्टेफनी वर साडे तीन तासाची सर्जरी करण्यात आली त्यामुळे त्यांचे नाक एकदम तजेलदार झाले त्यांचा जबडा नरम करण्यात आला. आणि  वरील ओठ हे नरम करण्यात आले

 

आज स्टेफनीला सर्वजण एक स्त्रीच्या भूमिकेत स्वीकार करतात आहे स्टेफनीचा मोठा मुलगा नॅथन २१ वर्ष,  नाथ जोश्या १७ वर्षाचा स्टेफनीला भेटण्यासाठी आले होते स्टेफनी ने सांगितले की मी आज जरी एक स्त्री असली तरी त्यांची पिताच आहे.  फक्त पॅकेजिंगमध्ये थोडा बदल झालेला आहे.... फक्त  एवढंच !

0 Comments

Post Comments