मधुचंद्राबद्दल केवढ्या स्वर्गीय कल्पना होत्या मी! प्रियाने सगळा विचका करून टाकला. दोन वर्षांपासून लग्न ठरलं आहे आमचं. हिने माहिती करून घ्यायला नको होती का? एवढ्या मैत्रिणी आहेत हिच्या, विचारू नये हिने कोणाला? प्रघोत तावातावाने बोलत होता. प्रिया मान खाली घालून बसली होती, डोळयात आसवं होती. तुमचा प्रेमविवाह आहे का? मी प्रघोतला विचारलं. हो, आणि पुढाकार प्रियाचाच होता. तिनेच ओळख काढली होती. त्यावेळी उत्सुक असायची ती मला भेटायला! आणि आता दूर लोटायला बघते. प्रघोत उद्गारला. आता मात्र प्रिया जरा उसळून म्हणाली, 'मी मुद्दाम काहीच करत नाही प्रघोत, मला भीतीही वाटत नाही. पण वेदनाच एवढ्या होतात, की सहनच होत नाही.' 'पहिल््यांदा होतोच सगळयांना त्रास असं मित्रही सांगता माझे. थोडं सहन करता येत नाही तुला?' इति प्रघोत. 'हे बघा, मी आधी प्रियाची तपासणी करते, मग आपण ठरवू कसा सोडवायचा ते!' तपासणीत मला असं आढळलं, की प्रियाचं योनीपटल कडक होतं, ज्याला वैद्यकीय भाषेत आम्ही रेजिड हायमेन म्हणतो, ज्यासाठी स्त्रक्रियाच करावी लागते. फार कमी स्त्रियांमध्ये हा दोष आढळतो. प्रियाला मी लगेच एका स्त्रीरोगतज्ञांकडे पाढवलं, तिचा प् सुटला. सला घ्यायला आले नसते तर उगीचच एकमेकांवर दोषारोप करत बसले असते आणि मग दोघांमधील तेढ वाढली असती. रम -रमा या जोडप्यांबाबतीत वेगळाच किस्सा घडला. लग्न होऊन तीन महिने झाल््यावर रमाची पाळी लांबली होती. तिच्या आईला वाटलं, की दिवस गेले. पण ते खरं नव्हतं हे रमाच्या सांगण्यावरून त्यांना समजलं. रमाकडून त्यांना समजलं की, अजूनपर्यंत दोघांचा संबंध आलेलाच नाही. रमाच्या आईला वाटत होतं, की दोघांना सला घेण्यासाठी पाठवावं, पण वडील जाम खवळले. इतके दिवस गप्प बसद्दल रमालाच रागावले, आणि घटस्फोटाच्याच तयारीला लागले, रमाला सासरी पाठवेचनात. पण रमेशचे वडील माझा ओळखीचे असळय़ामुळे त्यांनी रमेश -रमा यांना माझाकडे आणलं, बरोबर रमाच्या वडिलांनाही घेऊन आले, कारण रमाला एकटीला पाठवायला ते तयार नव्हते. मी रमेश बोलले, दोघांना तपासलं, समागम-तंत्राविषयीचं त्यांचं अज्ञान दूर केलं आणि रमा परत सासरी जायला तयार झाली. रमाच्या वडिलांना ते पडेना. ते माझाशीच तावातावाने भांडू लागले. 'डॉक्टर मी काही रमाला नांदायला पाठवायला तयार नाही, ती स्वभावाने गरीब म्हणून तिने तुमच्या म्हणण्याला होकार दिला असेल. पण हा रमेश तिला सुखी करू शकणार नाही. अहो, लग्नाला तीन महिने लोटल््यावरही ज्याला पत्नीचा कौमार्यभंग करता आला नाही, त्याला षंढ नाही म्हणायचं तर काय? जो खरा पुरुष असेल त्याला स्त्री जवळ आली, की जमायलाच पाहिजे ती क्रिया!' 'हे बघा, त्या दोघांना त्यांच्या विवाहोत्तर समागम अपूर्तीच्या प्रशनाबाबत मी सविस्तर समजावून दिलं आहे. तेव्हा त्यांचा आता त्यांना सोडवू द्या. दोघांमध्येही कोमताच शारीरिक दोष नाही. अज्ञानामुळे त्यांचा संबंध होऊ शकला नाही. एकत्र राहिले नाहीत तर पुढले प्रयत्न कसे करणार?' माझं समजावणं. 'ते काही मला माहीत नाही. माझी फसवणूक केली गेली आहे. रमा, चल पोरी घरी. आपण कायद्याचा हिसका दाखवू या लोकांना. षंढ असून लग्न केलं, मला फसवलं? मी वकिलाचा सला घेतला आहे. डॉक्टर, तुमचा उगीचच वेळ गेला या लोकांसाठी.' बाप निघण्यासाठी उठला, तरी मुलगी तशीच बसून राहिली होती. मी जे समजावून सांगितलं ते रमाला पटलं असावं. ती आपल््या वडिलांना उद्देशून म्हणाली, 'बाबा, इतका वेळ मी काही बोलले नाही, पण आता तुम्हाला मी निक्षून सांगते, की आमचा प्रश्न सोडवायला मी आणि रमेश समर्थ आहोत. तुम्ही उगीच त्रास घेऊ नका.' रमा जेमतेम एस.एस.सी. झाली होती, पण तिच्यामध्ये समंजसपणा होता, त्यामुळे तिने आपला प्रश्न चातुर्याने सोडवला. पण काहीवेळ उच्चिशिक्षित मुली आपल््या दुराग्रही स्वभावामुळे स्वतःबरोबर जोडीदाराचंही नुकसान करत असतात. लग्नाच्या पहिल्या रात्री पतीला लैंगिकसंबंध जमला नाही म्हणून एका इंजिनियर मुलीने पती षंढ आहे असा समज करून घेतला. लगेच त्राग्यानं 'कसं जमत नाही तुम्हाला? नक्कीच शारीरिक दोष असणार.' असंही तिने पतीला बोलून दाखवलं. पतीने तिला समजावून देण्याचा प्रयत्न केला, की 'मानसिक तणामुळे लिंगाला ताठरपणा आला नाही म्हणून जमलं नसेल, तसा माPयात दोष नाही.' १०-१२ दिवस तसेच गेले. पत्नी वारंवार 'तुमच्यात नाही ना दोष? मग दाखवा की संबंध करून.' असं म्हणून पतीला हिणवत राहीली. पत्नीच्या आव्हानामुळे तो पती मनाने जास्तच खचला, त्याचा परिणाम त्याच्या उत्तेजनांवर झाला. त्याला समागम प्रयत्नाच्यावेळ ताठरपणाच येईनासा झाला. त्या पत्नीचा मग पतीवरील विश्वास उडाला, ती दोन महिन्यातच माहेरी निघून गेली. तिने कोर्टात केस दाखल केली, पतीवर षंढत्वाचा आरोप केला. तारखा पडत गेल्ल्या/ प्रकरण रेंगाळत होतं. शेवटी परस्परसंमतीने घटस्फोट घेऊन दोघं मोकळा झाले. हा तरुण घटस्फोटानंतर दुसरा विवाह ठरवण्याआधी माझ्याकडे सला घेण्यासाठी आला, त्यावेळी वरील हकीकत त्याने मला सांगितली. अधीक चौकशी करताना माPया असं लक्षात आलं की या तरुणाला स्त्री-शरीरातली संबंधाची नेमकी जागा माहिती नव्हती. बाकीचं समागम तंत्रही त्याला अवगत नव्हतं. मात्र हा तरुण नंतर भावी पत्नीसह माझ्याकडे आला. माझ्याशी सविस्तर चर्चा करून दोघांनी विवाह केला. विवाहानंतर आधीच्या अपयशाचा ताण त्या तरुणाच्या मनावर आला, त्यामुळे त्याला उत्तेजना येईना, परत दोघं माझ्याकडे आले, स्त्रीने समागमात कशा प्रकारे भाग घ्यावा, पुरुषाला उत्साह वाढावा म्हणून तिने नक्की कसं वागावं हे मी त्याच्या पत्नीला समजावून दिलं. तिने ते समजून घेतलं. मनापासून प्रयत्न केले आणि १५-२० दिवसात त्यांची समस्या सुटली. काही तरुणांमध्ये वास्तविक पाहता शारीरिक दोष काहीच नसतो. त्यांना हस्तमैथुन करताना, आणि पहाटेही व्यवस्थित ताठरपणा येत असतो. पण लग्नापूर्वी कधीतरी स्त्री-समागम न जमल््यामुळे आपल््याला ते जमणारच नाही. कमतरतेची जबरदस्त जाणीव त्यांच्या मनात असते. पण घरांच्या आग्रहाखातर किंवा सामाजिक दडपणामुळे त्यांना लग्नं करावं लागतं. असे काही महाभाग पत्नीशी संबंध टाळत राहतात. पण दोषारोप मात्र पत्नीवरच करतात. उगीचच तिचे कोणतेतरी गोष काढत राहतात. मात्र खरं तर ती पसंतच नव्हती, आईवडीलांनी ऐकलंच नाही. हिच्या स्तनांचा आकार लहान आहे, मला तिचं आकर्षणच वाटू शकत नाही, आधी कपड्यांमुळे कळलं नव्हतं. तिने पहिल्या रात्री काहीच करू दिलं नाही म्हणून माझं मन विटलं. किंवा माझ्या आईचा तिने अपमान केला, माझ्या मनातून ती उतरली. वगैरे तक्रारी ते करत राहतात. इतरांना त्या तक्रारींमध्ये दम वाटत नाही. पण हा त्याचा दुराग्रह सोडत नाही. अशाना नेमक्या अगदी सरळमार्गी, गरीब स्वभावाच्या बायका पत्नी म्हणून लाभतात. जर अशा पुरुषाची पत्नी बाणेदार असेल, त्याच्या तक्रारींना ती प्रत्युत्तर देत असेल तर तिची लैंगिक भूकच जास्त आहे अशी बोंबाबोंब तिच्याविरुद्ध करून तिच्याबद्दल संशय व्यक्त केला जातो. वैतागून पत्नीने घटस्फोटाची मागणी केली, तर त्याला काय हवंच असतं ते! सुंठीवाचून खोकला बरा झाल््याचं समाधान त्याल मिळतं. काही नवविवाहितांमध्ये असं दिसून येतं की पत्नीला समागम क्रियेची विलक्षण भीती वाटत असते. अशी तरुणी एक तर पतीला सारखी दूर ठेवण्याचा टाळण्याचा प्रयत्न करत राहते, नाही तर मग बाकी श्रृंगारक्रिडा करु देते, त्यात रस ेते, पण समागमाची स्थिती घेतल््यावर किंवा घेण्याआधीच तिचा योनीमार्ग खूप संकुचित करून घेतला जातो. मग हळूहळु तिची कामेच्छाही कमी होते आणि तिच्या पतीच्या उत्तेजनानंतरही परिणाम होवू लागतो. कामक्रस्त्रविषयक अज्ञानामुळेच या गोष्टी घडतात. विवाहाआधीच योग्य ते ज्ञान तरुण तरुणींनी मिळवलं तर या नंतरच्या समस्या निश्चितपणे टाळता येतील. पुरुषाने स्तःमधील कामसमर्थ्याचा निकष म्हणून समागमाकडे बघू नये आणि स्त्रीनेही हे काय पुरुषाचंच काम असं म्हणून बघ्याची भूमिका घेऊ नये. म्हणूनच लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात समागम क्रिडा घडवण्याला अवास्तव महत्व देऊ नये, तर परस्परांच्या आवडीनिवडी, सवयी जाणून गेण्यावर भर द्यावा. म्हणजेच परस्पर सुसुंवाद साधला जाईल. एकमेकांशी समायोजन करण्याची क्षमता वाढेल. पती-पत्नींमधील प्रेम हे एक हवंहवंसं वाटणारं बंधन आहे. हे समजण्यासाठी दोघांनाही मानसिक, बौद्धिक परिपक्वता यायला हवी, सहजीवन जबाबदारीपूर्वक पेलण्याची क्षमता यायला हवी. पती-पत्नीकडून सुप्रजानिर्मिती होण्यासाठी, समाजाला सुसंस्कारीत नागरिक समाजाला, सुसंस्कारीत नागरिक देण्यासाठी, म्हणजेच प्रत्येक बालकामधून माणूस घडवण्यासाठी या गोष्टींची जाणीव निर्माण होणं फार महत्वाचं आहे.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL