१. मंगळवारी व शुक्रवारी मुंग्यांना साखर खाऊ घाला. नागकेशर, गहू, तांब्यांचा तुकडा किंवा पादुका व मीठ यांची पुरचुंडी करून शुक्रवारी घराच्या आढ्याला टांगणे. २. तलावातील माशांना खाद्यपदार्थ देणे. ३. दर मंगळवारी लाल वस्तूेंचे दान करणे.(मसूर डाळ) ४. पौर्णिमेच्या रात्री आंघोळ करून रात्री १२-१८ वाजता चंद्राकडे पाहून गायत्री मंत्र १२ वेळा बोलून कोणाशीही न बोलता झोपी जावे. जर प्रसंगच बोलण्याचा आला तर बोलल्यानंतर पुन्हा हातपाय धुऊन पुन्हा चंद्रबिंबाकडे पाहून गायत्री मंत्र जपावा : 'ॐ भुर्भुवः स्वः तत्स् वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही धियोयोनः प्रचोदयात ' यामुळे महिनाभर खिशांत लक्ष्मी राहते. खिसा भरलेला राहतो. ५. एक सोपा उपाय. दर मंगळवारी हातापायाची नखे काढून ती पुडी बंद करा व घराबाहेर ती पुडी टाकून द्या. हळू हळू आर्थिक परिस्थिती सुधारेल. ६.कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशांतून ५ लवंगा किंवा ५ लसणीच्या सोललेल्या पाकळया एका पुडीत बांधून घेऊन जाव्यांत. यामुळे पैशांच्या कामातील दुष्ट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते. आर्थिक लाभ होतो. ७.पिंपळाच्या वृक्षाच्या बुंध्यात पांढरे तीळ व दूध असे 'ॐ चैतन्य अश्वत्थाय शरणं मम' असे म्हणत सोडावे याने श्रीविष्णुची पूजा होते व लक्ष्मीपतीची सेवा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. ८.श्री स्वामी समर्थ हा जप रोज घरातल्या सर्वांनी किमान १०८ वेळा म्हणावा. कोणही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा. धनलाभ संततीचे ही प्रश्न मिटतात. ९. व्यापारी वृद्धी यंत्राबरोबर नागकेशर ठेऊन पूजा केली तर दुप्पट फायदा होतो. १०. व्यापार वृद्धी यंत्राला काळा दोरा लपेटून त्याची पूजा केली तर व्यापारातील संकटे दूर होतात. ११.उजव्या शंखाचे महत्त्व - श्री महालक्ष्मी प्रप्तीसाठी उजवा शंख पूजेस ठेवणे फार महत्त्वाचे मानतात. उजव्या शंखातील पाण्याने श्रीयंत्रावर अभिषेक करीत खालील मंत्र म्हणावा. तत्काळ अनुभव येईल. मंत्र - ।। ॐ एें श्री सर्वकार्य सिद्धिं कुरु कुरु ममः।। १२.दिवाळीच्या अमावास्येला, कोणत्याही ग्रहणात किंवा कोणत्याही अमावास्येला एक लवंग व एक वेलदोडा तुपाच्या दिव्यावर जाळुन त्यांचे भस्म करावे. हे भस्म श्री लक्ष्मीच्या चित्राला किंवा प्रितमेला रोज लावावे. त्वरित लाभ होतो. १३. घरात दर शनिवारी भोजनात काळे चणे थोडे तरी असावे. शनिवारी गहू दळायला द्यावे. त्या गव्हात थोडे काळे चणे मिसळावे धनवृद्धी होते. १४. बाहेरून घरी येताना काहीतरी वस्तू अवश्य आणा वाळलेले पान कागदाचा सुद्धा चालेल. पण रिकाम्या हाताने घरी येऊ नका. शक्य असेल तर एखादा गोड खाऊ किंवा देवपूजेचं साहित्य आणा निदान फूल तरी आणा. अर्थलाभ होईलच होईल. १५. लक्ष्मीप्रप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळुन ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. १६. लक्ष्मीची कृपा निरंतर राहिल. - नरकचतुर्दशीपासून फुलबाजारातून गुलाबाचे रोज एक फूल विकत आणावे. लाल रंगाचे मिळाल्यास दुधात साखरच. मग ते नव्या कोर्या लाल वस्त्रात गुंडाळुन कपाटात, तिजोरीत, गल्ल्यात ठेवावे. असे भाऊबीजेपर्यंत करावे. त्रिपुरी पौर्णिमेला ती सर्व सुकलेली फुले दिवेलागणीच्या वेळी वहात्या पाण्यात सोडून द्यावीत. इथून पुढे पैशाचा तुटवडा कधीच भासणार नाही. १७. लक्ष्मीपूजनानंतर लगेचच घराच्या किंवा व्यापारी पेढीच्या किंवा दुकानाच्या प्रत्येक कोपर्यात उभे राहून शंख जोरात फुंकावा . घरात वास करणारी अलक्ष्मी (लक्ष्मीची थोरली बहीण) काढता पाय घेईल आणि लक्ष्मी स्थिर राहिल. १८. लक्ष्मीपूजनापूर्वी कुबेराची पितळेची मूर्ती विकत आणून तिची स्थापना केल्यास तुमचा 'पैसे कसे मिळतील?' हा प्रश्न कायमचा निकालात निघेल. १९.तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या व अनुष्ठानाने सिद्ध केलेल्या 'श्रीयंत्रा'ची स्थापना लक्ष्मीपूजनाचे दिवशी प्रथम ताम्हनात तांब्याचे 'श्रीयंत्र' घेऊन 'ॐ श्रीः!' हा मंत्र १०८ वेळा करताना पळीने पाणी घालावे. नंतर स्वच्छ धुतलेल्या वस्त्राने 'श्रीयंत्र' स्वच्छ पुसावे. नंतर त्याला पांढरे किंवा तांबडे गंध व अत्तर लावून पांढरे फूल वहावे. नंतर 'श्रीयंत्र' तांदूळ पसरलेल्या ताम्हानात ठेवावे. मग 'श्रीसूक्त' म्हणावे. ते मुखोद्गत नसल्यास पुस्तकात पाहून म्हणावे. परंतु उच्चार स्पष्ट व शुद्ध नसल्यास पुस्तकात पाहून म्हणावे; परंतु उच्चार स्पष्ट व शुद्ध असावेत. 'श्रीसूक्ता' चे आवर्तन पूर्ण होताच पूजकाचे सर्वप्रथम 'श्रीयंत्रा ' चा आपल्ल्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला स्पर्शर् करावा. नंतर ते नेहमी नेहमीसाठी एका स्टीलच्या वाटीत अक्षतांमध्ये खोचून ठेवावे. २०. लक्ष्मीपूजनाचे दिवशी सुर्योदयापूर्वी शुचिर्भूत होऊन चौकात अनवाणी उभे राहावे व घरून आणलेल्या लिंबाच्या सुरीने ४ फोडी करून त्या ४ दिशांना फेकून मागे वळून न पाहता घरी परतावे. अल्पावधीत आर्थिक सुबत्ता प्रप्त होईल. २१. बलिप्रितपदेपासून दररोज स्नान करून, शुचिर्भूत होऊन, धूतवस्त्र नेसून दर्भासनावर बसून स्फटिकाच्या माळेवर 'महादेव्यै च विह्महे विष्णुपत्न्यै च धीमहि। तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ।।' या लक्ष्मी गायत्री मंत्राचा परिपाठ ठेवा. २२. शक्यतो भाऊबीजेलाच; पण ते शक्य झाले नाही, तर दुसर्या दिवशी भगवती लक्ष्मीचे स्मरण करून मूठभर बासमती तांदूळ (तुकडा नको) वाहत्या पाण्यात सोडा. लक्ष्मीप्रप्तीच्या अनेक संधी तुमच्याकडे चालून येतील. २३. ५ मंगUवार किंवा ५ शुक्रवारी सायंकाळी गरीब सवाष्णबाईला बोलावून खणा - नाराळाने तिची ओटी भरून तिला फुटाणे व गोड दूध द्यावे. महालक्ष्मी प्रसन्न होऊन लक्ष्मी अखंड मिळते. २४. प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला देवीची खणा - नारळाने ओटी भरावी. शुद्ध व वद्य दोन्ही अष्टमींना त्यावेळी खालील मंत्र म्हणून ओटी भरावी. नमो माये, महा माये, सर्वसिद्धी प्रजायिनी। अन्नं, वस्त्र, तथा द्रव्यं, देहीमे परमेश्वरी।। २५. दर मंगUवारी व शुक्रवारी महालक्ष्मीचा पाठ वाचावा. २६. दर मंगळवारी, शुक्रवारी हळदीकुंकू समारंभ करून सौभाग्यवतीस सौभाग्यवर्धक गोष्ट आणि बत्तासे, साखरफुटाणे, काबुलीफुटाणे, दूध, केळी द्यावी. साडी, वस्त्र जे शक्य ते दान द्यावे. २७. दर सोमवारी दुकान बंद असते अशा वेळीची उपासना - शिवमंदिरात नित्य नियमाने प्रतःकाळी शंकाराच्या पिंडीवर कच्चे दूध व पाणी आणि चार थेंब मधाचे अशा मिश्रणाच्या पाण्याचा एक तांब्या अभिषेक करावा. प्रत्येक सोमवारी शुद्ध तुपाचा दिवा लावावा व प्रदोष उपवास ठेवावा. एक हजार जप करावा. ॐ नमः शिवाय हा मंत्र जपावा. असा उपाय केल्याने अर्थप्रप्ती होते. काहीतरी धन शिल्लक राहते. २८. दर मंगUवारी मुठभर गहू व गुळाचा खडा कोणत्याही रंगाच्या गाईला खायला द्यावा. ११ मंगळवारी करावे. पैशाचे प्रश्न सुटतील. २९. घरातील केरसुणी नवीन आणल्यावर तिचे हळदकुंकू लावून पूजन करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये. ३०. घरात संध्याकाळी सर्वत्र धूप दाखवावा. तो हाताने पसरवू नये तर पंख्याने पसरवा. धूप नसल्यास अगरबत्तीही चालेल. ती घरात सर्वत्र फिरवावी. ३१. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नये. दिल्यास ते बुडतात वा वसुलीस त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्ज फेड करावी वा शुक्रवारी कर्ज फेड केल्यास आर्थिक स्थिती सुधारते. मंगळवारी पैसे / कर्ज घेतल्यास लवकर फिटत नाही. ३२. दुपारी १२ नंतर जेवणाअगोदर अन्नाचा एक घास कावळयास घालावा. तसेच मुंग्याना थोडीशी साखर घाला याने कर्ज/वैर/पितृदोष निवारण होतात. ३३. दररोज आपल्या कुलदेवता, कुलदैवत, इष्ट देवता, कुलपुरुष, वास्तू पुरुषाचे सकाळी स्मरण करावे. ३४. दिवाळीला धनपूजा व लक्ष्मीपूजा घरीच करावे. गावी किंवा प्रवासाला जाऊ नये. सर्व घरात दिवे लावून प्रकाश करावा व तो रात्री उशिरापर्यंत ठेवावा. कोणत्याही खोलीत अंधार नसावा. वीज कपात असल्यास निरांजन वा पणत्या लावून ठेवाव्यात. ३५. रस्त्यात अचान पैसे मिळाल्यास ते उचलून कपाळाला लावून खिशांत वेगळे ठेवून घरी आल्यावर एका वेगळया डबीत ठेवून कपाटात सन्मानपूर्वक ठेवून धनत्रयोदशीला त्याचीही पूजा करावी. पैशाची कमतरता होत नाही. ३६.घरांत देवाजवळ एका डबीत किंवा भांड्यांत सुटे पैसे (नाणी) ठेवावीत व त्यांतील पैसे दान, धर्म किंवा देवस्थांनातील पूजा अभिषेक यांना खर्च करावा. घरांत लक्ष्मी स्थिर रहाते. कमाईला बरकत येते. ३७. सूर्य मावळल्यानंतर कोणासही उसने पैसे देऊ नयेत. दुसरे दिवशी यावयास सांगावे व द्यावे. मात्र आपली उधारी रात्री दिली तरी हरकत नाही. परिणाम : सूर्यास्तानंतर दिलेली लक्ष्मी हळूहळू कमी होऊ लागते. आपण स्वतः कर्ज काढण्याच्या परिस्थितीत येतो. ३८. लक्ष्मीप्रप्तिसाठी दर सोमवारी (एकादशी तिथी सोडून) अखंड तांदूळाचे ११ दाणे शंकरावर वाहावे. अनुभव घेऊन पहा. ३९. श्री सत्यनारायणाची पूजा व व्रत हे इच्छित फळ देणार असून सर्व मनोकामना पूर्ण करणारे असे शिघ्र फलदायी व्रत होय. ४०.घरात लक्ष्मीचा अखंडवास राहण्यासाठी एक विष्णूचा फोटो अवश्य लावावा. जिथे विष्णू तिथे लक्ष्मी असा नियम आहे. लक्ष्मीचा फोटो विशिष्ट प्रकारचा हवा. ती लक्ष्मी बसलेली असावी (उभी नको) व तिच्या दोहो बाजूंना सोंड वर केलेले दोन हत्ती असावेत. तसेच लक्ष्मीचे पाय कमळात झाकलेले असावेत. या फोटोतील लक्ष्मीला रोज हळदकुंकू वाहावे व नमस्कार करावा. ४१. गुरुवारी जर धनलाभ झाला तर त्यापैकी काही भाग (२५-३० रुपये) एका पांढर्या लिफापÌयात घालून देवघरात ठेवावे अधिक द्रव्य खेचून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य यात आहे. ४२. श्रीसूक्तातील खालील ऋचा रोज १०८ वेळ असे २१ दिवस म्हणत गेल्यास लक्ष्मीची कृपा होते. ॐ कां सोस्मितां हिरण्यप्रकारामार्द्रांम् ज्वलंती तृप्तां तर्पयंतीय्। पद्मे स्थितां पद्मपर्णां तामिहोपहवये श्रीयम्।। ४३. आपल्या कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक पूजा अवश्य करावी. ४४. विष्णु सहस्त्रनाम व व्यंकटेश स्तोत्र नियमाने वाचावे. काही कमी पडणार नाही. ४५. लक्ष्मी गायत्री मंत्राचा रोज १०८ जप करावा ॐ महालक्ष्मै च विद्महे विष्णुपन्त्यै च धीमही। तन्नो लक्ष्मी प्रचोदयात।। ४६. दिवाळीत घरच्या केरसुणीलाही हळदिकुंकु लावून नमस्कार करावा. ४७. दर मंगळवारी न चुकता मूठभर मसूर डाळ व थोडासा गूळ तांबड्या गाईला घातल्याने कर्जमुक्ती होऊन संपत्ती येते वा आर्थिक स्थिती सुधारते. ४८. ज्यांना धनाची अपेक्षा आहे अशा व्यक्तींनी एखाद्या मंगळवारी अगर शुक्रवारी लक्ष्मीची रंगीत तसबीर आणून ती आपल्या बाहेरच्या खोलीत पश्चिमाभिमुख लावावी. दर मंगळवारी व शुक्रवारी तसबीर ओल्या फडक्याने पुसून तिला गंध व सुवासिक फूल लावावे. देवीची आरती म्हणावी व साळीच्या लाह्या व बत्तासे यांचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवावा. घरातील प्रमुख भगिनीने (पत्नी, आई वगैरे कोणीही) शुक्रवारी उपवास करावा. असे नित्य करावे. लक्ष्मीमाता प्रसन्न होऊन आर्थिक परिस्थिती खूप सुधारेल. कर्ज वगैरे निवारण होईल. ४९. आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र, वह्या, खतावणी इत्यादींवर अष्टगंधाने 'श्री' किंवा 'शुभलाभ' असे लिहावे. आर्थिक व्यवहारात यश मिळते. ५०. अचानक पैसा हाती येण्यासाठी शाबरी मंत्र ''ओम् शाबरी देव्यो मम गृहे लक्ष्मीं स्थिरं कुरु कुरु स्वाहा'' हा मंत्र गुरुवारी सुरु करावा. संकल्प करावा. रोज १०८ प्रमाणे पुढील गुरुवार पर्यंत रोज १०८ वेळा म्हणावा. त्यानंतर रोज २७ वेळा म्हणावा व अनुभव घ्यावा. यामुळे अचानक पैसा मिळून कर्जमुक्ती होईल. ५१. चिंचेच्या झाडाची लहान फांदी कापून घरात, गल्लीत किंवा खिशात ठेवल्याने धनात वाढ होते. तसेच घराला फायदा होतो.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this news