१. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नये. दिल्यास ते बुडतात वा वसुलीस त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्ज फेड करावी वा शुक्रवारी कर्ज फेड केल्यास आर्थिक स्थिती सुधारते. मंगळवारी पैसे / कर्ज घेतल्यास लवकर फिटत नाही. २. संध्याकाळ नंतर दिवे लागल्यास पैसे कोणास देऊ नयेत. तसेच राहूच्या होर्यात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये. ३. रविवारी हातापायाची नखे कधीही कापू नयेत वा घरात सांडू नयेत ह्याने दारिद्रय येते. मंगळवारी नखे कापावीत अचानक पैसे येतात. ४. घरातील केरसुणी नवीन आणल्यावर तिचे हळदकुंकू लावून पूजन करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये. ५. पैश्यासंबंध देवाणघेवाण करण्यास जाताना आपल्या उजव्या खिशात ५ लवंगा पुडीत घालून ठेवावे. याने कोणतेही विघ्न न येता व्यवहार चांगला होतो. ६. दुपारी १२ नंतर जेवणाअगोदर अन्नाचा एक घास कावळयास घालावा. तसेच मुंग्याना थोडीशी साखर घाला याने कर्ज/वैर/पितृदोष निवारण होतात. ७. दर मंगळवारी न चुकता मूठभर मसूर डाळ व थोडासा गूळ तांबड्या गाईला घातल्याने कर्जमुक्ती होऊन संपत्ती येते वा आर्थिक स्थिती सुधारते. ८. कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्र असता कार्तिक स्वामींचे दर्शन जरूर घ्यावे आर्थिक अडचण दूर होते. १०. घरात संध्याकाळी सर्वत्र धूप दाखवावा. तो हाताने पसरवू नये तर पंख्याने पसरवा. धूप नसल्यास अगरबत्तीही चालेल. ती घरात सर्वत्र फिरवावी. ११. दररोज आपल्या कुलदेवता, कुलदैवत, इष्ट देवता, कुलपुरुष, वास्तू पुरुषाचे सकाळी स्मरण करावे. १२. पगाराचे / कमाईचे / धंद्याचे पैसे संध्याकाळी सर्वचे सर्व घरी आणावेत मध्ये खर्च करू नये. त्या पैशात आपल्याकडचे ५ वा १० रुपये त्यात घालून ते देवापुढे ठेवून १ अगरबत्ती लावून थोड्या वेळाने कपाटात ठेवावेत. दुसर्या दिवशी त्यातील पैसे वापरावेत. १३. शनिवारी तेल विकत आणू नये वा शेजार्यांकडून उसने आणू नये. १४. संध्याकाळ नंतर घरात मीठ, पीठ, साखर, दूध, दही वा कोणतीही पांढरी वस्तू कोणास देऊ नये. ह्या घरात त्या वस्तूंचा तुटवडा भासतो. १५. द्रव्यप्रप्तीसाठी सोमवार वा बुधवारी निघावे शुभ होय. १६. घराच्या मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवणे. तसेच संध्याकाळी तिन्हिसांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दाखविणे. १७. दिवाळीत फराळ, मिठाई व घरी केलेल्या जेवणाचा नैवेद्य (१) आपल्या सर्व पूर्वजांना (२) गाईला (३) वास्तुपुरुषाला दाखवून पूर्वजांचा व वास्तू पुरुषाचा नैवेद्य कावळयास देणे, वास्तुपुरुषाची प्रितमा जिथे निक्षेप (ठेवली) केली आहे त्या ठिकाणी तो नैवेद्य ठेवून त्यास भोजन करण्यास यावे म्हणून प्रर्थना करावी. बराच वेळ ठेवल्यावर तो नैवेद्य कावळयास ठेवणे याने पूर्वजांचे व वास्तू पुुरुषाच शुभार्शिवाद लाभतात व चांगले होते. १८. दिवाळीला धनपूजा व लक्ष्मीपूजा घरीच करावे. गावी किंवा प्रवासाला जाऊ नये. सर्व घरात दिवे लावून प्रकाश करावा व तो रात्री उशिरापर्यंत ठेवावा. कोणत्याही खोलीत अंधार नसावा. वीज कपात असल्यास निरांजन वा पणत्या लावून ठेवाव्यात. १९. रस्त्यात अचान पैसे मिळाल्यास ते उचलून कपाळाला लावून खिशांत वेगळे ठेवून घरी आल्यावर एका वेगळया डबीत ठेवून कपाटात सन्मानपूर्वक ठेवून धनत्रयोदशीला त्याचीही पूजा करावी. पैशाची कमतरता होत नाही. २०. दिवाळीत घरच्या केरसुणीलाही हळदकूंकु लावून नमस्कार करावा.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this news