तथापि एवढी काळजी घेऊनही मूळ वास्तूतच काही दोष असेल तर काय करावे असा प्रश्न काही वाचक विचारतील. वास्तू शुद्ध करण्यासाठी काही प्रथमिक स्वरुपाचे उपाय येथे सुचवित आहे. वास्तू फार दूषित नसेल तर त्यांना निश्चित उपयोग होतो. मात्र हे उपाय सतत सहा महिने तरी न कंटाळता करणे आवश्यक आहे. दोन - चार दिवस करून त्यांचा काहीही उपयोग होणार नाही. खरे तर सहा महिने हा कालावधीही फार कमी आहे. वास्तू किती प्रमाणात दूषित आहे यावर हा कालावधी स्वरुपात चालू ठेवले पाहिजे. म्हणजे वास्तूत नवा त्रास निर्माण होणार नाही. आता वाचकांची उत्सुकता न ताणता काही प्रथमिक स्वरुपाचे उपाय सांगतो. (१) आपली वास्तू जास्तीत जास्त स्वच्छ व पवित्र ठेवण्यासचा प्रयत्न करावा. पावित्र्य निर्माण होण्यासाठी रोज देवपूजा, स्तोत्रवाचन (विशेषतः रामरक्षा), घरासमोर सडा शिंपडून रांगोळी काढणे, घरात अधूनमधून गोमूत्र शिंपडणे, देवीकवच, अर्गला, कीलक व कुंजिकास्तोत्र यांचे पाठ करणे, नवार्णव मंत्राचा जप करणे, नवनाथ, गुुरचरित्र इ. पोथ्यंची पारायणे करणे (किंवा रोज शंभर ओेव्या मोठ्याने वाचणे), घरात धूप जाळणे, उदबत्त्या लावून वातावरण सुगंधित ठेवणे. (२) ज्या वास्तूत नित्य काही उपासना तसेच नामस्मरण इ. चालू आहे, वेदमंत्राचा घोष होतो आहे तशा ठिकाणी दुष्ट आत्मे राहू शकत नाही. तथापि काही कारणाने एखादी वस्तू बाधिक असेल तर पुढील प्रथमिक उपाय लगेच नेटाने सुरु करावेत. काही वेळा उपाय सुरु केल्यावर त्रास जास्त वाढतो कारण त्या दुष्ट शक्तींना ती वास्तू सोडून जाण्याची इच्छा नसते. म्हणून त्रास वाढला तर आपण सुरु केलेले उपाय योग्य आहेत असे समजून तेच श्रद्धापूर्वक चालू ठेवावेत. साधारणतः सहा महिन्यानंतर त्यांचा परिणाम दिसू लागेल. त्यामुळे घाई करु नये. आता काही अनुभवसिद्ध उपाय सांगतो. ते प्रथम करावेत. उगाच मांत्रिक तांत्रिकांच्या नादी लागून पैशाचा अपव्यय करू नये. हे उपाय असे ­ (१) रोज किंवा निदान एक दिवसाआड घरात गोमूत्र शिंपडावे. ते न मिळाले तर हिंगाचे पाणी चालेल. (२) रोज जेवणापूर्वी वास्तुपुरुषासाठी वेगळा नैवेद्य आठवणीने दाखवावा. (३) अमावस्येला तिन्हीसांजेला मुख्य दरवाज्यावरून ७ वेळा दही भात उतरून टाकावा. (४) अमावस्येला उंबर्यावर एक नारळ उलटा वाढवावा. (शेंडी आपल्याकडे करून) तसेच घरातील देवासमोर सहा महिने तरी अखंड नंदादीप लावावा. (५) रोज घरासमोर सडा शिंपडून रांगोळी घालावी. त्यात स्वस्तिक चिन्ह अवश्य असावे. (६) रोज घरात ११ वेळा रामरक्षा व १ वेळा भीमरुपी स्तोत्र मोठ्याने म्हणावे. (७) घरात जास्तीत जास्त शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच घर व घराचा परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेववा. (८) पंचमी, अष्टमी व पौर्णिमा या दिवशी देवीला कुंकूमार्चन करावे. त्यावेळीदेवीची १०८ नावे घेत घेत देवीवर कुंकू वाहावे. हे कुंकू दुसर्या दिवशी काढून नीट जपून ठेवावे. व तेच कपाळी लावावे. तसेच थोडेसे पाण्यात कालवून त्याचा सडा घरात शिंपडावा. त्यायोगे घरात मांगल्य निर्माण होते. (९) चार - पाच काळे गोफ मुठीत घेऊन अकरा वेळा रामरक्षा व एक वेळा भीमरुपी स्तोत्र मोठ्याने म्हणावे व ते गोफ घरातील प्रत्येकाने गळयात घालावेत तसेच एक गोफ बाहेरच्या दरवाज्यावर बांधावा. (१०) घरात रोज कालभैरवाष्टक तसेच पंचमुखी हनुमानकवच यांचे पाठ मोठ्याने करावेत. (११) बाहेरच्या दारावर गदाधारी मारुतीचा फोटो (चित्र) लावावा. वरील उपाय सातत्याने बरेच दिवस चालू ठेवल्यास तुमची वास्तू शुद्ध झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. या व्यतिरिक्त पुढील सूचनांचेही कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. (१) घरात कुठेही अडगळ वा घाण ठेवू नये. कारण अशाच जागा दुष्ट शक्तींना प्रिय असतात. (२) घरातील सर्व फरशा अधूनमधून फिनाईलने स्वच्छ पुसून काढाव्यात. (३) घराबाहेर पोपट वगैरे पक्षी पिंजर्यात कोंडून ठेवू नये. कारण त्यांचे मूक शाप बाधल्याशिवाय राहत नाही. (४) घरातील देवांवर विटाळशीची सावली चुकूनही पडणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा वेळी देवघरावर शाल वगैर पांघरून ते बंद ठेवावे. (५) वेदमंत्रांच्या वॉसट्स लहान आवाजात निदान दर एकादशीस व गुुरुवारी अवश्य लावाव्यात. त्या मंत्र्याची स्पंदने वातावरणाची शुद्धी करतात. (६) घरात आरडाओरडा, भांडणे टाळावीत.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this news