ब्राझील येथील पियाऊ राज्यात पोलिसांच्या म्हणण्यानुसार एकदा ते ड्रग्स डीलर्सकडे धाड घालण्यास गेले असता "मामा पोलीस मामा पोलीस" असे म्हणत एक पक्षी तेथून उडत होता परंतु 22 एप्रिल च्या पोलिसांच्या एका झडती मध्ये ह्या पोपटाला पोलिसांनी झडप घालून पकडून घेतले. त्याला या ड्रग्स डीलरनी खास प्रशिक्षित केले होते. तेथील अधिकारी मेजर मेलो या ऑपरेशनमध्ये तैनात होते. तेव्हा या पोपटांनी झडती सत्रामध्ये हस्तक्षेप केला तिथे पोलीस पोहोचल्यावर लगेच या पोपटाने परत ओरडण्यास सुरुवात केली. परंतु या पोपटाला झडप घालून पोलीसानी पोलीस स्टेशनवर घेऊन गेल्यानंतर त्याने काहीच ओरडा ओरड केली नाही. परंतु बऱ्याच प्रयत्नानंतर ह्या पोपटाचा मालक त्याच्या बरोबर अजून एक माणूस व एक त्याची मुलगी अशी तिघेजण पोलिसांच्या हाती आली. या तीस वर्षाच्या एडवार्णला घरात झालेल्या भांडणामुळे तो ड्रग्स डीलर आहे हे पोलिसांना कळले. पोलिसांनी त्याला व त्याच्या मुलीला अटक केल्यानंतर तपासणी केल्यावर त्याच्या मुलीच्या अंडरवेअर मध्ये मारिजुआना हा अमली पदार्थ जप्त केला त्यानंतर त्या दोघांनाही सोडून देण्यात आले परंतु या पोपटाला सोडण्यात आले नाही दोन दिवसानंतर त्याला प्राणीसंग्रहालयात सोडण्यात आलं ह्या अगोदरही असेच दोन ते तीन वेळेला पोपटांना रन हा शब्द पोलिसांनी ऐकला होता अधिकाऱ्यांचा दावा आहे की लोरेंझो ड्रग माफिया तर्फे सतराशे पोपटांना असे तयार केली आहे त्यातलाच हा एक पोपट आहे.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL