’फोन फिरवा मजा लुटा.‘ या सारखे चित्र स्वरूपात जाहीराती रोज वर्तमान पत्रात वाचायला मिळतात. ज्याचा उद्देश एकच असतो तरूणांना आकर्षीत करणे. आज शहरामध्ये असे काही फोन क्लब आहेत की ज्या ठीकाणी बसणाऱ्या मुली ह्या फोन करणाऱ्या लोकांच्या ईच्छा आणि मागणीची कदर करताना त्यांना अश्लील आणि उत्तेजक बोलतात. अशी व्यवस्था पूर्वी पश्चीमी देशांपुरतीच मर्यादीत होती. आता भारतीयांच्या आवडीनुसार पश्चीमी सेक्स व्यापारी लोकांनी ही व्यवस्था आपल्या देशातसुद्धा उपलब्द करुन दिली आहे. लोकांना आकर्षीत केलं जातंय. अश्लील बोलण किंवा ऐकणे यांच्या आवडीमुळे ही व्यवस्था स्विकारली जात आहे. एक फोन फिरवा व रसीले लैंगिक बोलत रहा. जेव्हा या फोन नंबरवर बोलले जाते तेव्हा दुसऱ्या बाजुने ती स्त्री सुध्दा अश्लील आणि उत्तेजक बोलायला सुरवात करते. अशी व्यवस्था पूर्वी पश्चमी देशापुरतीच मर्यादीत होती. परंतु भारतात सुध्दा अश्लील बोलणे ऐकण्यास उत्सुक लोक आहेत. यामुळे ही पध्दत आपल्याकडे आली. या टेलीफोन नंबरवर बोलतांना बील सुध्दा इतक्या लवकर येते की दोन तीन मिनीटांच बील सुध्दा हजारात द्यावं लागते. परंतु भारतात असं बील कमी स्वरूपात येते परदेशात अश्या स्त्रियाची व्हीजीटींग कार्ड प्रत्येक टेलीफोन बुथवर आढळतात. ज्या स्त्रीया अश्लील बोलायला सदैव तयार असतात. मागल्या वर्षी आऊट लुक मधे फोन सेक्सला घेऊन एक सर्वे छापला गेला होता. जे फोनवर अश्लील बोलतात असे लोक आपल्या पत्नीपासून समाधानी नसतात किंवा त्यांची उत्तेजना सुध्दा असं बोलणं ऐकूनच वाढते. वास्तवात हेच कारण आहे जे लोक सक्षम नसतात तेच लोकल उलटा सरळ फोन नंबर लावतात आणि समोरच्या स्त्री बरोबर अश्लील बोलतात. असं काही नाही की फक्त पुरूषच या कामामधे आहेत स्त्रीया सुध्दा काही कमी नाहीत. ज्या महिला फोन लावून समोरच्या बरोबर अश्लील बोलतात. असे पुष्कळ लोक आहेत जे फोनवर अज्ञात स्त्रीला कींवा मुलींना त्रास देतात. अशा लोकांची एक निश्चीत वेळ असते. जेव्हा ते फोन करतात फोन उचलल्या नंतर ते फक्त स्त्री किंवा मुलींच्या तोंडातुन हॅलो ऐकूनच फोन ठेवून देतात. ती स्त्री हा विचार करते की बहुतेक फोन कट झाला आणि फोन ठेवून देते. परत तो दुऱ्यांदा फोन करतो व तीच क्रीया करतो. असे तीन चार वेळा केले जाते. असे बऱ्याच वेळा झाल्यानंतर समोरची मुलगी विचार करायला लागते शेवटी काय भानगड आहे?यानंतर परत एक वेळ ते फोन लावतात व फोन उचलताच अश्लील बोलायला सुरवात करतात. जर समोरची स्त्री सुध्दा जर अश्लील बोलत असेल तर ठीक अन्यथा अशी क्रीया ते सारखी सारखी करतात शेवटी ती समोरची स्त्री चिडते व बदमाश लफंगा म्हणून फोन ठेवून देते. पूर्वी हा फक्त छंद होता परंतु आज माणसाला रोजच ही क्रीया केल्याने सवय झाली आहे व ती माणासाची प्रवृत्ती बनली आहे. काही पुरूष असे सुध्दा असतात की स्वतः फोनवर कुठल्या तरी स्त्री बरोबर बोलत असतात व अंगावरचे सर्व कपडे काढून हस्तमैथुन करीत बसतात. याच्यामध्ये त्यांना भरपूर आनंद मिळतो. ट्रेनचे बाथरुम शौचालय या ठीकाणी फार अश्लील स्वरुपाच लिखाण आपण पाहीलेलं असेल. असे लोक सुध्दा यामध्ये सामील असतात जे अश्लील लीखाण भिंतीवर करतात व कल्पना करतात की जर कोणी स्त्रीने वाचले तर ती उत्तेजीत होईल. ते फक्त असे लिहूनच उत्तेजीत होतात. काही लोक तर असे असतात अश्लील लिहील्या नंतर समोरच्या स्त्रीने ते वाचावे, वाचल्यानंतर तिची प्रतीक्रया काय असेल हे पहाण्यासाठी कुठेतरी लपून रहातात व तिची प्रतिक्रीया हण्याचा प्रयत्न करतात. काॅलगर्ल नावाच्या एका प्रसिध्द पुस्तक लेखीका डाॅ. प्रमीला कपुर यांनी अश्या अनेक काॅलगर्लची वर्णने आपल्या पुस्तकात केली आहेत तिच्या कडे काही अश्या प्रकारचे ग्राहक येतात की जे फक्त त्यांच्या बरोबर बोलतात त्यांना विनंती करतात की त्यांच्याबरोबर अश्लील बोलावे. असेच अन्य पुरूषांनी त्यांच्या बरोबर रंग रंगेली केली आहे. ते ग्राहक फक्त त्यांना एकच मागतात की तुम्ही अश्लील बोलणे करावे व आपला अनुभव सांगावा. टेलीफोनवर बोलण्याचा काही लोकांचा उद्देश असा असतो की ते त्यांना जास्तीत जास्त आनंद प्राप्ती होईल काही लोक बिछाण्यात आपल्या पत्नी बरोबर झोपलेले असतांना सुध्दा फोनवर अज्ञात स्त्रीबरोबर बोलून उत्तेजीत होतात. फोनवर बोलत असतांना ते कल्पना करतात की आपण त्या स्त्रीच्या सहवासात आहोत आणि अश्यापकारे हसतमैथुन करुन स्खलीत होतात. तशी एक गोष्ट समोर आली आहे ती ही की यापासून सरकारला भरपूर फायदा आहे परंतु लोक मात्र बरबाद झाले आहेत. जे फोन सेक्स पिडीत आहेत. सरकारने सुध्दा यावर बंदी घालायला हवी ज्यामुळे तरुण पिढी बरबाद होत चालली आहे. त्यांना वाचविण्यासाठी सरकारने उपाय करायला हवेत. कारण अशा लोकांच्या जवळ आत्मशक्ती कमी असते जे स्त्री समोर येऊन बोलू शकत नाहीत. केवळ फोनवरच बोलू शकतात स्त्रीचा सामान करु शकत नाहीत. फोनची मदत घेतात. आज शहरामध्ये ज्या प्रकारे स्त्रियांना व मुलींना फोन द्वारे त्रास दिला जातो आहे पुढील काळात हा प्रकार फार भयंकर रूप धारण करणार आहे. तेव्हा अशा फोन करणाऱ्याना पकडणे अवघड होईल. कारण पोलीस प्रशासन किंवा फोन एक्सचेंजवाले त्यांना पकडण्यासाठी बसून तर राहू शकत नाहीत.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL