काही देशांमधे घटस्फोट आणि पुनर्विवाह जीवनाचा एक घटक बनला आहे. त्यांनी नाईलाजाने स्विकारले आहे. कधी कधी मुलांचा ताबा कोणाकडे असावा म्हणून जो संघर्ष होतो त्यावरून क्रेमर व्हर्सेस क्रेमर सारखे संस्मरणीय चित्रपटही निर्माण झाले. घटस्फोट झालेल्याकडून काही किमान अपेक्षा ठेवल्या जातात. त्यात काही गफलत झाली तर जीवघेणा प्रसंग ओठवून घेण्याची शक्यता असते. नव्या परिस्थितीशी जुळवून घेतांना मागच्या अत्यन्त मधुर आठवणीही विसरायच्या असतात किंवा आठवण आली तरी उच्चारायाच्या नसतात. त्याने कोणाला अहंकार उफाळूनत्याच्याहातून भयानक कृत्य होऊ शकते. याचे आपण एक उदाहरण पाहू. सदर प्रकरणात २४ वर्षीय फिडेल लोपेझ आपली गर्लफ्रेंड मारीया नेमेथला भेटत होता. अश्या भेटीगाठी जवळीक वाढवण्यास आणि त्याचे रुपांतर विवाहात करण्यासाठी होत असतात. अश्या भेटीगाठीत शारीरिक संबंधही प्रस्थापीत होऊ शकतात. प्रेम करण्यास झालेल्या एका भेटीत फिडेलने मारीयाचा चक्क खून केला ! त्याला कारण होते तिने प्रेम करतांना आपल्या पूर्व पतीचे नाव उच्चारले होते. फिडेल इतका पराकोटीचा खवळण्याचे कारण होते मारीयाने भूतपूव्र पतीचे नाव एकदा नव्हे तर दोनचा उच्चारले होते. त्याने त्याच्यातील राक्षस जागृत होऊन त्याने भयानक कृत्य केले. स्वतः फिडेलने पोलिसांना फोन करून बोलावले. प्रथम त्याने आपण प्रणय केला त्यानंतर मारीया बाथरुममध्ये गेली आणि तिला उलट्या झाल्याची जबानी दिली. केवळ उलट्यांनी पोट फाडून आतडी बाहेर येणार नाही. चौकशी दरम्यान त्याने पुढे सगळे कबुल केले. कामक्रिडांच्या वेळेस दुसऱ्याचे नाव उच्चारणे त्याला सहन झाले नाही. रागाच्या भरात प्रथम त्याने हाताशी येईल त्या वस्तूंची मोडतोड आणि फेकाफेकी चालू केली. त्यानंतर बीयरची बाॅटल, केसांची इस्त्री आणि दोन्ही हात तिच्या पोटात खुपसून कोथळा बाहेर काढला. त्याच्यावर फस्र्ट डिग्री मर्डरचा आरोप ठेवला गेला आहे. चौकशी दरम्यान सत्यकथन केले नसते तर पोलीसांनी उपलब्ध पुराव्यावरून त्याचा गुन्हा सिद्ध केला असता. पोलिसांना घरामधे केवळ आतडीच नव्हे. तर शरीरातील इतर भागातील मांसाचे तुकडे विखुरलेले आढळले होते. घरात मारिया आणि फिडेल शिवाय इतर कोणीच नसल्याने फक्त फिडेलवर आरोप ठेवता येतो. भयानक अपराध होतो तेव्हा पोलीस संशयीताचा इतिहासही पहातात. घटनेपूर्वी फिडेलने टकिला घेतले होते. होते. रेकाॅर्डप्रमाणे २०१४ मधे अतिरक्त मद्यपान केलेले आढळले होते.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL
editor

फोन सेक्स