गोरखनाथ करिता प्रिसध्द असलेले भारताच्या उत्त्तर भारतात असलेले एक मोठे शहर.हे शहर गोरखपुर जिल्हयाचे मुख्यालय ही आहे. हे शहर उत्त्तर भारतच्या पूर्व भागात भारत नेपाळच्या अंतरराष्ट्रीय सिमेजवळ वसलेले असून लखनौच्या २७० किमी पूर्वेकडे तर अलाहाबादच्या २७० किलो मिटर ईशान्यास तर पटणा च्या २८० किलो मिटर वायव्येस हे गोरखपुर शहर आहे. येथील गोरखपुर रेल्वे स्टेशन भारतीय रेल्वेच्या १०० सर्वाधिक वर्दळिच्या स्थानकां पैकी एक रेल्वे स्थानक आहे. माजी भारतीय फिरकी गोलंदाज नरेंद्र हिरवाणशीमुन्शी प्रेमचंदजी.तसेच सध्याच्या सिने युगातले दिग्दर्शक अनुराग कश्यप हे देखिल हया गोरखपुरचेच. जश्या जगात चांगल्या वाईट गोष्टी घटना घडतात तशीच एक अपराधीक घटना येथे ही घडली. गोरखपुचे प्रिसध्द आर्यन हॉस्पीटलचे मालक ''डॉक्टर.धर्मेंद्र प्रताप सिंह'' ला एसटीएफ ने शुक्रवार दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजी त्यांची पे्रमीका ''राखी श्रीवास्तव'' ची नेपाळमध्ये हत्या करण्याच्या गुन्हयात अटक केली.त्याचबरोबर राखी श्रीवास्तवच्या हत्ये मध्ये सामिल डॉक्टरच्या दोन मदतगार कर्मचार्यांना देखील ताब्यात घेतले.गोरखपुच्या शाहपुर क्षेत्रातल्या बिछीया विभागातील राजेश्वरी उर्फ राखी श्रीवास्तव जून २०१८ मध्ये अचानक बेपत्ता झाली होती. त्यामुळेदुसरा पती मनिष सिन्हा ने २४ जून २०१८ ला गोरखपूर ला भेटून पत्नी राखी बेपत्ता असल्याची तक्रार केली. त्या मनिष ने डॉक्टर डीपी सिंह वर शक केला.राखीच्या बद्दल मनिष ला महित होते. मनिष आणि राखीचे लग्न २०१६ साली झाले होते. मनिष ला शक ही होता की राखीचे परिवारवाले पण तिची हत्या करू शकतात. राखीचा भाऊ श्री.अमर प्रकाश श्रीवास्तव ने रितसर तिच्या बेपत्ता होण्याची तक्रर शाहपूर पोलिसठाण्यात ४ जुुलाई २०१८ ला दाखल केली.ज्यात एसएसपींच्या मार्गदर्शनाखाली पोलिस इंन्सपेक्टर श्री.प्रदीप कुमार शुक्ला जी ने सदर केसचा तपास सब इंन्सपेक्टर श्री.राजकुमार सिंहकडे दिला. राजकुमार सिंह ने अमर प्रकाशची संपूर्ण व्यथा एैकुन शाहपुर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७५/२०१८ भादवी ३६६/५०६ खाली गुन्हा नोंदवुन घेतला .परंतु हयात भानगड अशी आहे की अमर प्रकाश ने बहिणीच्या बेपत्ता होण्या मागे तिचे दुसरे पति मनीष सिन्हा वर तिचे अपहरण केल्याचा आक्षेप घेतला. म्हणून शाहपुर पोलिस ने बेपत्त्याला अपहरण आणि धमकीत रूपातंर करूण तपास सुरू केला. मनीष सिन्हा हे बिहार च्या वजीरगंज पोलिस ठाण्याच्या हद्दितील लोहागर भागात रहातात.त्यांनी पुढे आपल्या बीएसएफ च्या आणि पोलिस दलाच्या अधिकार्यांसह उत्तर भारताचे मुख्यमंत्री श्री.योागी आदित्यनाथ हयांची जनता दरबारात भेट घेऊन राखीच्या शोधा करिता विनंती केली. हया बाबत शाहपुर पोलिस ठाण्या सहीत गोरखपुर क्रईम ब्राच आणि एसटीएफ ही लक्ष देऊन होते. खास करून एसटीएफ चे एसएसपी श्री.अभिषेक सिंहने आपल्या टिम ला हया प्रकरणावर विशेष लक्ष ठेवण्यास सांगिलते होते.त्या टिमला डॉक्टर.धर्मेंद्र पी सिंह वर संदेह झाला.डॉक्टर.डी पी सिंह हे गोरखपुर मंडल जिल्हा कुशीनगर मधील बतरौली गांवचे रहिवासी. त्यांचे गरिब शेतकरी वडिलांनी श्री.प्रताप सिंह ने डॉक्टरचे एमबीबीएस पर्यंन्तचे शिक्षण पूर्ण केले. डॉक्टरने एमबीबीएस केल्यानंतर शिक्षणात बुध्दीमान विदयार्थी असल्या कारणाने पुढे एमडी चे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर वडिलांनी लग्न लावून दिले. नंतर गोरखपुर मध्ये डॉक्टरने स्वत:चे क्लिनीक खोलले. ती खूप चांगली चालली. एवढी चालली की डॉक्टरने प्राॉपर्टी विकता घेण्यातही चव दाखविली. पुढे गोरखपुर शहरात ३ ठिकाणी क्लिनीक सुरू केल्यानंतर आर्यन नर्सिंग होम सुरू केले. ज्यात राखीशी प्रेम संबंध जुळले. पोलिसांना राखीचा मोबाईल फेानचे लोकेशन टे्स केल्यावर कळले की ज्या वेळस राखी बेपत्ता झाली त्या वेळस तिचे शेवटचे लोकेशन ४ जून २०१८ पर्यंत नेपाळमध्ये सर्विलांस वरूण लोकेट झाले. अभिषेक सिंह साहेबांना विचारल्याशिवाय एक टिम कौआबाग पोलिस ठाण्याचे विवरण हंगामी अधिकारी श्री.राजाराम द्विवेदी जी ताबडतोब मनिष सिंन्हा ला घेऊन नेपाळला रवाना झाले. बर्फमय थंड हवेचे ठिकाण पोखरा येथे पोहचल्यावर तेथील कईक ठिकाने हॉटेल वगैरे मध्ये राखीचा शोध घेताला. पण डॉक्टर आणि त्याच्या साथीदारांचा ही कुणाला सुगावा त्यांना लागला नाही.नंतर एसटीएफ ने नेपाळच्या देशाच्या पोलिसांची मदत घेतली.ज्यात त्यांना कळले की नेपाळच्या कास्की पोलिसांना ८ जुन २०१८ सारंग कोटा जिल्हयातील कास्की पोखरात एका ३५ वर्ष महिलेचा मृतदेह सापडला होता. एसटीएफ ताबडतोब नेपाळला पोहचले. आणि नेपाळच्या कास्की पोखराचे डीएसपी श्री.मोहन बहादुर खाड जी तसेच नेपाळ पोखराचे डीआयजीपी श्री.दन सिंग बोहरा जीं च्या मदतीने स्वत: भारतातून घेऊन गेलेल्या फोटोची आणि त्या मृतदेहाची बारकाईने पहाणी केल्यावर तो देह राखी श्रीवास्तवचाच असल्याचे निष्पण झाले.ही बाब जेव्हा स्पष्ट झाली तेव्हा एसटीएफ ने चौकशीची सिमा वाढविली. त्या तपासात पोलिसांना कळाले की राखी २ जून ला आपला पती मनिष सिंह सोबत विमानाने नेपाळला गेली होती.पती मनिष सिंह परत आले पण राखी तिथेच थांबली.४ जून रोजी मनिष संगे राखीचे शेवटचे बोलने झाले.त्याच दरम्यान राखी सोबत मोबाईल वर ५०० वेळ बोलण्याच्या पुराव्या नुसार डॉक्टर.धर्मेंद्र प्रताप सिंह देखील त्याच्या २ नौकरां देश दिपक निषाद व प्रमोद कुमार सिंह सहीत नेपाळला पोहचला होता.ते तिथे राखीला भेटले आणि तिला घेऊन ते पोखरा येथे गेले. तिथे राखीला दारू पाजून त्यात नशेचे पदार्थ टाकून राखीला पाजून तिला तेथील ऊंच डोंगरावरूण ढकलून देऊन तिची हत्या नेपाळमध्ये करून भारतात परत आले. साधारण २००६-२००७ साली राखीचे वडील श्री.हरेराम श्रीवास्तव ह्यांची तबेत खराब झाल्या कारणाने त्यांना डॉक्टर.डी पी सिंह च्या आर्यन हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्या वेळेस शुश्रुषेच्या च्या रूपात राखी पित्याची सेवा करित राहीली. हरिराम च्या परिवारात पत्नी निर्मला शालिनी उर्फ रेणु तसेच राखी उर्फ राजेश्वरी नावाच्या दोन मुली त्याचबरोबर अमर आणि विजय नावाची दोन मुले आहेत. राखी चा भाऊ अमर हा प्रयव्हेट नौकरी करित होता तर विजय प्रॉपर्टी डिलर होता. हया दरम्यान दवाखाण्यातील सततच्या संपर्कामुळे डॉक्टराशी राखीची भेट वाढत गेली. त्या भेटींच्या संख्या वाढत असतानाच राखी आणि डॉक्टर मध्ये संबंध वाढले आणि त्यांनी फेब्रुवारी २०११ मध्ये जनपद गोंडा मध्ये जाऊन लग्न केले.डॉ.डी पी सिंह ची पहीली पत्नी श्रीमती.उषा सिंह ला त्याच्या दुसर्या लग्नाबाबत काहीच माहित नव्हते. त्यांना एक मुलगी ही झाली पण तिचे मरण इलाज दरमियान हॉस्पिटल मध्येच झाले.दिल्लीत घडलेल्या अतिप्रिसध्द अश्या निर्भया हत्याकांडनंतर डॉक्टरची पत्नी उषा सिंह ने रेप आणि अपहरण चा गुन्हा डॉक्टरवर दाखल केला.जे सध्या न्यायालयाच्या विचारधीन आहे. गोरखपूरच्या बछिया शाहपुर सरस्वतीपुरम ठाण्या परिसरात डॉक्टर चे एक महागडे करोड रूपयाचे घर होते.त्या घरात डॉक्टरने राखीला पत्नीच्या नात्याने "ठेवले.परंतु तेच घर राखी स्वत:च्या नावावर करण्यास डॉक्टरवर दबाव आणायची.नंतर त्या दोघांचे नाते जास्त दिवस नाही टिकले.साल २०१६ च्या फेब्रुवारी महिण्यात राखीचे लग्न बिहारच्या गया वजीरगंज लोहगर गांवातील बीएसएफ जवान श्री.मनीष कुमार सिन्हा शी झाले. लग्नानंतर ही मनिष ने राखीला आपल्या ना वडिलोपर्जित घरी नेले एखादे घर घेऊन दिले. त्याला राखी आणि डॉक्टरच्या संबंधा बद्दल माहिती होती. परंतु फक्त राखी वर अतुट प्रेम असल्याकारणाने त्याने राखी शी विवाह केला. मनिष तिला आपल्या युनिट मधुन भेटण्यास गोरखपुर मध्ये डॉक्टरच्या घरीच यायाचा. पुढे त्या लग्नानंतर ही राखी आणि डॉक्टरचे अनैतिक संबंध परत सुरूच राहिले. त्यातल्या त्यात राखी नेहमी डॉक्टरला ब्लकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळत असे. राखी ने डॉक्टरच्या आणि स्वत:च्या अंतरंग क्षणाचे पाॅर्न विडीओ ही शुट केले होते. डॉक्टरच्या एक करोड रूपयाच्या घरावर तिचा डोळा होता त्याला कंटाळुन डॉक्टरने कित्येक दिवसांपासून राखी ला वटणिवर आणण्या करिता योजना बनविण्याची सुरूवात केली होती की कसे तरी करून तिचा खात्माच करायचा. त्यानुसार योजना तयार ही केली.ती ४ जून २०१८ ची. मंगळवार दिनांक ४ जून २०१८ रोजी स्वत: डॉक्टर. त्याचे नोकर प्रमोद कुमार सिंह देश दिपक निषाद हे नेपाळ ला रवाना झाले. प्रवासात प्रमोद सिंह हा गाडी चालिावत होता. तर देश दिपक त्याच्या शेजारी बसला होता आणि डॉक्टर पाि"मागच्या सिटवर एकटा बसला होता. दुपारच्या वेUेस ते तिघे नेपाUला पोहचले. नेपाळवरूण थोडे से आत गेल्यावर रसत्यावर राखी बळग घेऊन उभी असलेली त्यांना भेटली. तत्पूर्वि डॉक्टरचे राखी शी नेपाळच्या नंबर वरूनच बोलने झाले होते. भेटीनंतर राखी डॉक्टरसह पाि"मागच्या सिटवर बसली आणि ती लोक नेपाळच्या पोखराकडे रवाना झाली. बुटवल पासुन थोडेसे पुढे पाटवाल जवळत्यांनी नाश्ता केला.तद नंतर बुटवल पासुन १०० किलोमिटरच्या अंतरावतर मुलंग येथे एका हा@टेलात रात्र झोपुन काढली. हॉटेल मध्ये त्यांनी २ रूम घेतले होते ज्यात एका रूम मध्ये डॉक्टर आणि राखी तर दुसर्या रूम मध्ये दिपक आणि प्रमोद होते.नंतर जवळ पास सकाळी जेवन करून ११ च्या दरम्यान ते चौघे पोखराकडे निघाले.तेथील डेविस ची मजा घेतली.सायंकाळी ५ च्या दरम्यान सगळे पोखरात पोहचले. तिथे नाश्ता करून डोंगरावरती सारंगकोट मधील एका हॉटेलात रूम घेतला.तिथे त्यांनी चहा नाश्ता सहीत मदिरा ही प्रषान केली पण राखीच्या चहात डॉक्टरने ऐलाप्रक्स दव्याची पावडर गुपचुप मिक्स केली होती.त्या मुळे राखीची तब्येत रात्री ११ च्या दरम्यान खराब होत गेली.त्याच रात्री ती लोक राखीला घेऊन पोखरा कडे रवाना झाले. त्या गाडीतच राखी बेहोश झाली.त्यानंतर त्या तिघांनी बेहोश राखीला गाडी बाहेर काढले आणि तेथील उंच डोंगरावरून खाली फेकुन दिले. तदनंतर प्रमोद आणि देश दिपक मोबाईल घेऊन गोहाटीला गेले.तिथे तो मोबाईल फेकला.ज्यामुळे पोलिस तपासात राखीचे शेवटचे वर्तमान लोकेशन ४ ऑक्टोंबर २०१८ ला गोहाटी दाखवित होते आणि तिथुनच ते दोघे ३ महिने राखीचे फेसबुक अकाऊंट सतत अपडेट करून राखी जिवंत असल्याचे सोशल मिडीयावर भासवत होते. राखी परतली नाही म्हणून तिच्या भावाने पोलिसांत तक्रर केली .राखीचा पती मनिष सिन्हा वर ही पोलिसांनी संशय घेतला. पण मनिष निदेार्ष असल्याचे कळताच पोलिसांनी आपला मोर्चा डॉक्टर. धर्मेंंद्र सिंह कडे वळविला.त्याची खुप कसून चौकशी केल्यानंतर त्याने राखीच्या हत्येची कबुली दिली. मग पुढे गोरखपुर पोलिसांनी नेपाळ पोलिसांच्या मदतीने राखी श्रीवास्तवचा मृतदेह ताब्यात घेऊन तिच्या कुटुंबियांकडे सुपुर्द केला.धर्मेंद्र सिंह सहीत त्याच्या दोन साथीदारांनाही शाहगंज पोलिस ठाण्याने दाउदपुर नाक्यावरूण गुन्हयाच्या भादवीचा दर्जा वाढवून गुन्हा रजिस्टर नंबर ३८९/२०१८ भा.द.वी कलम ३६]३/ ३६]६/३०]२/५०६ गुन्हया खाली अटक केली.तसेच त्यांच्या कडून राखीचे ४ मोबाईल फोन आधार कार्ड आणि पारपत्रक जप्त केले. सदर प्रकरणात गोरखपूर पोलिसाचे आयजी श्रीमान.अमिताभ यश जीं चे म्हणने आहे की पोलिसांकडे डॉक्टर.धर्मेंद्र आणि त्याच्या साथीदारांन विरोधात राखीच्या मर्डरला धरूण खुप भक्कम पुरावे आहेत.ज्यात नेपाळ पोलिसांची ही मदत घेतली जाईल.जर गरज वाटली तर नेपाळ पोलिसही त्यांच्या कडे खुन्यांच्या विरोधात कारवाई करतील. थोडक्यात दोन्ही देशांच्या मदतीने डॉक्टरला आणि त्याच्या साथीदारांना एकदम कडक शिक्षा दिली जाऊ शकते.सदर गुन्हयाच्या तपासात गोरखपुरचे एसटीएफ चे आय जी श्री.अमिताभ यश हयांच्या मार्गदर्शना खाली एसएसपी डॉक्टर.सुनिल गुप्ता शाहगंज पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्री.प्रिदप कुमार शुक्ला जी राजाराम द्विवेदी जी सब इंन्सपेक्टर श्री.राजकुमार सिंह आदि नीं मिळुन तपासात मेहनत घेतली.ज्यात प्रमुख्याने सदर गुन्हयाचे चौकशी ऑफिसर श्री.पी.एस गोरखनाथ जीं चा समाावेश आहे. परंतु राखी श्रीवास्तव सारख्या कईक महिला आपणास पुरूषांना ब्लकमेल करताना आढळतात.ज्यामुळे कदाचित तश्या महिलांचा असा दुर्देवी मृत्यु होतो.हे दुर्देव्यच आहे. श्रीमान रविंद्र शिवाजी दुपारगुडे/के.रवि


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this news