मॉस्को : खर्या आयुष्यात रशियाची ब्युटी क्वीन आता एक क्वीन बनली आहे. मलेशियाचे सुल्तान मुहम्मद फारिस यांच्याशी तिने विवाह करून इस्लाम धर्म स्वीकारला. रशियात झालेल्या या शाही विवाहानंतर ती मलेशियाची राणी बनली आहे. तिचे नाव ओक्साना वोएवोदिना असे असून २०१५मध्ये तिने मिस मॉस्को खिताब जिंकला होता. तिचे वडील एक डॉक्टर असून रशियासह थायलंड आणि चीनमध्ये तिने सुद्धा प्रोफेशनल मॉडेल म्हणून काम केले आहे.
रशियात २२ नोव्हेंबर रोजी हा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाहात अल्कोहोलवर बंदी होती तसेच पाहुण्यांना केवळ हलाल जेवण देण्यात आले. २०१६मध्ये मुहम्मद फारिस यांना मलेशियाचे सुल्तान करण्यात आले. ४९वर्षांचे सुल्तान फारिस आणि ब्युटी क्वीन ओक्साना (२५) यांच्या वयात २४ वर्षांचे अंतर आहे. सुल्तानने लग्नात पारंपारिक मलेशियन पोशाख घातला होता. तर व्हाइट रंगाचा वेडिंग गाऊन ओक्सानाने परिधान केला होता. तिने या लग्नासाठी वर्षभरापूर्वीच आपले धर्म बदलून इस्लाम धर्म स्वीकारला होता. तिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर हिजाबचा फोटो देखील पोस्ट केला. आपल्या महाराणीचे मलेशियातील नागरिकांनी जंगी स्वागत केले. तसेच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL