दक्षिण कोरिया हा अन्य देशांपेक्षा अनेक बाबतील वेगळेपण जपणारा देश आहे. येथील लोक अंधश्रद्धाळू आहेत मात्र अनेक जुन्या परंपरांचे पालन आजही या देशाची तंत्रज्ञानातील प्रगती लक्षणीय आहे. या देशात जगात सर्वाधिक वेगाने इंटरनेट चालते आणि ८० टक्के लोक त्याचा वापर करतात. अनेक नामवंत इलेक्ट्रोनिक कंपन्या या देशात असून त्यांनी जगात त्याचा दबदबा निर्माण केला आहे.
या देशात खूपच मजेशीर वाटतील अश्या अनेक परंपरा आहेत आणि आधुनिक काऴातही त्या पाऴल्या जातात. येथे माणसाच्या रक्तगटाचा संबंध त्याच्या व्यक्तिमत्वाशी जोडला जातो आणि त्यामुळे मैत्री, जोड्या जमविताना कुठल्या रक्तगटाशी आपले जुऴू शकेल याचा विचार केला जातो.
येथील नागरिकांना प्लास्टिक सर्जरीचे वेड आहे. देशातील १/३ महिला कोणत्या ना कोणत्या प्रकारची कॉस्मेटिक सर्जरी किमान एकदा तरी करतात. या उलट येथील पुरुष वर्ग मेकअपचा चाहता आहे. येथील पुरुष वर्षाला अंदाजे ९०० दशलक्ष डॉलर मेकअप वर खर्च करतात. मित्रांसोबत हँगआउट अथवा गेट टुगेदर करण्यासाठी कोणत्याही सोयीच्या जागी असलेल्या स्त्रीत कॉर्नरला पसंती दिली जाते.
येथील डेटवर असलेली तसेच विवाहित जोडपी एकसारखा पोशाख करण्यास प्राधान्य देतात. युवा वर्ग यामागे ते डेटवर आहेत असा संदेश देतात. येथे दुकानात जोडप्यांना वापरता येथील असे पेअर्ड शूज, ड्रेस मिळतात. नर्सरीतील मुलांना ठराविक रंगाचा गणवेश दिला जातो. प्रेग्नंट महिलांना सरकार ५०० डॉलर्स हे स्पेशल क्रेडीट कार्ड देते, त्यांच्यासाठी पाकिंगला खास जागा असते आणि सबवे मध्ये गुलाबी रंगाच्या सीट राखलेल्या असतात.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL