युनान (चीन) ‚जगभरात वेगवेगÈया प्रकारचा समाज राहतो आणि तेवढेच त्यांचे रीतिरिवाजही विचित्र आहेत. चीनच्या युनान आणि सिचुआन प्रांतांत राहणारी मोसुओ समाजही यापैकीच एक आहे. लग्न करण्याचा कोणताही या समाजामध्ये रिवाज नाही. आपल्या मर्जीने तरुण‚तरुणी जोडीदार निवडतात, पण त्यांच्यात ना लग्न होते, ना मुलाच्या घरी मुलगी नांदायला जाते. फक्त एका दिवसासाठी हे संबंध ठेवले जातात किंवा दीर्घकाळही असू शकतात. ते ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार त्या दोघांना असतो. पण मुलांना प्रत्येक रात्र मुलीच्या घरी घालवावी लागते. यासंदर्भात चाइना डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, या समाजामध्ये मुलीचे वय १३ वर्षे झाल्यानंतर ती आपला जोडीदार निवडू शकते. मुलीप्रमाणेच जोडीदार निवडण्याचा अधिकार मुलांनाही असतो, पण हे सर्वकाही मुलीच्या सहमतीनेच. ज्याला मुलगी अथवा मुलाने पसंत केले तो तिला चारकोल, मिरची आणि चिकनच्या पंखांनी भरलेले एक पाकिट गिपÌट म्हणून पहिल्या प्रेमाची कबुली देतो. मग मुलगी अथवा मुलाच्या राजीखुशीने संबंधांशी सुरुवात होते. तथापि, संबंध सुरू करण्याआधी हे आवश्यक असते की, मुलगा‚मुलगी दोघेही मोसुओ जमातीचेच असावेत. मुलगा आणि मुलगी संबंध सुरू केल्यानंतरही दोघेही आपापल्या घरीच राहतात. फक्त मुलगा प्रत्येक रात्र मुलीच्या घरात काढतो आणि सकाळी आपल्या घरी निघून जातो. मुलगा अथवा मुलीची जोपर्यंत मर्जी असते, तोपर्यंत दोघेही सोबत वेळ घालवतात आणि हे संबंध ज्या दिवशी दोघांपैकी एकालाही संपवायचे असतील, ते एकमेकांना सांगून संबंध संपुष्टात आणतात. यानंतर दोघेही आपल्या नव्या पार्टनरचा शोध घेऊ लागतात. याला वॉकिंग मॅरिज नावानेच ओळखले जाते. मोसुओ समाजामध्ये कुटुंबावर पुरुषांची नाही, तर महिलांची सत्ता चालते. महिलाच घरातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेतात. या जमातीत पुरुषांचे काम मासेमारी करणे, जनावरांचे पालन करणे असे असते. त्यांना अक्सियास म्हटले जाते. येथे लोकांना त्यांच्या वडिलांच्या नावाने नाही, तर आईच्या नावाने ओळखले जाते.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL