जगातील सर्वात प्रसिद्ध स्पर्म डोनर म्हणून अमेरिकेतील २७ वर्षीय केल गॉर्डी हा ओळखला जातो. विशेष म्हणजे दर महिन्याला तो पाच महिलांना गर्भवती करतो. नुकतेच या स्पर्म डोनरने एका इंग्रजी वृत्तपत्रात त्याच्या जीवनातील अनेक रहस्ये सांगितली आहेत. तो वयाच्या २३ व्या वर्षी कसा स्पर्म डोनर बनला आणि रोज कशा रिक्वेस्ट त्याच्याकडे येतात हे सर्व त्याने सांगितले आहे.
वयाच्या २० व्या वर्षी अशा प्रकारे स्पर्म डोनेट करण्याची कल्पना केल गॉर्डी याला आली होती. त्यामागचे कारण म्हणजे तो रिलेशनशिपला बोर झाला होता. गेल्या चार वर्षांत अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये राहणारा केल गॉर्डी १८ मुलांचा पिता बनला आहे. पण त्याने त्या मुलांची जबाबदारी घेतलेली नाही. जगभरातील अशा महिलांची केल मदत करतो ज्या सिंगल आहेत किंवा कपल असूनही ज्यांना मुले होत नाहीत.
गॉर्डीने स्पर्म डोनेशनबाबत चार वर्षांपूर्वी फेसबूकवर एक पेज तयार करून जाहिरात दिली होती. त्याचे पेज काही दिवसांतच प्रसिद्ध झाले आणि त्याच्या स्पर्मला मागणी वाढू लागली. गॉर्डीच्या मते, तो सुशिक्षित कुटुंबातील आहे. त्याचे वडील वकील आणि आई प्रोग्रांमर आहे. त्याच्यात लॉयर आणि इंजिनीअर असे दोघांचे जीन्स आहेत. त्याशिवाय त्याचे लूक्सही शार्प आहेत. त्यामुळे होणारे बाळ सुंदर आणि हुशारही बनते. गॉर्डी सांगतो की, महिन्याला स्पर्मसाठी त्याच्याकडे १०० हून अधिक डिमांड येत असतात. पण तो दोन ते पाच डिमांडच पूर्ण करू सकतो. विशेष म्हणजे तो हे काम अगदी मोफत करतो. सध्या त्याच्या क्लाइंट्समध्ये १८ ते ४२ वर्षे वयापर्यंतच्या महिलांचा समावेश आहे. त्याचे पहिले क्लाइंट एक कपल होते. त्यांना आता एक चार वर्षाचे आणि १४ महीन्यांचे बाळ आहे. ही दोन्ही मुले गॉर्डीची आहेत. त्याने सांगितले की, तो सिंगल महिलांना स्पर्म देतो. त्या घरात सिरींजच्या माध्यमातून ते इंजेक्ट करतात. अनेकदा महिला त्याच्याकडे सेक्स फेवर मागतात. ती मागणीही तो पूर्ण करतो. गॉर्डी म्हणतो की, इतर देशांतून त्याला कोणी बोलावले तरी सर्व्हाrस देण्याची त्याची तयारी आहे. पण त्यासाठी त्याचे विमानाचे तिकिट काढायला हवे. तसेच तो नॉर्थ कोरिया किंवा युद्धाभूमीवर जाऊन सर्व्हीस द्यायलाही तयार आहे.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL