अतिश्रीमंत पैसा खर्च करण्यासाठी नवनवीन मार्ग नेहमीच शोधत असतात. असेच एक डेटिंगचे नवे रूप अमेरिका आणि युरोप देशात बोकाळत चालले असून त्याची लागण भारतही झाली आहे. हे नवे डेटिंग पॅड शुगर बेबी आणि शुगर डॅडी या नावाने वेगाने पसरत चालले आहे. भारताच्या बंगलोर सारख्या शहरात आज दररोज २० ते २५ तरुण मुली या क्षेत्रात प्रवेश करत असल्याचे दिसून आले आहे.
शुगर बेबी म्हणजे २० ते ३० वयोगटातील तरुण मुली आणि शुगर डॅडी म्हणजे मध्यमवयीन श्रीमंत पुरुष. हे पुरुष त्यांचे शौक पुरविण्यासाठी अश्या मुलींची मदत घेतात. यात मुलीना भरपूर पैसा मिळतोच पण त्यांना त्यांचे शौक पुरे करणे, ग्लॅमरस आयुष्य जगणे शक्य होते. काही मुली यातून त्यांचा शिक्षण खर्च तसेच शहरात शिक्षणासाठी राहावे लागल्याने वाढणारा खर्च भागवितात. एखाद्या पार्टीच्या माध्यमातून हे नाते सुरु होते. यात शरीर संबंध ठेवलेच पाहिजेत असे बंधन नाही त्यामुळे याला वेश्याव्यवसाय म्हटले जात नाही असे समजते.
हे फॅड रुजायला इंटरनेटचे योगदान मोठे आहे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मुली यात अधिक प्रमाणात आहेत असे आकडेवारी सांगते. शुगर डॅडी मध्ये उद्योजक, व्यावसायिक याचे प्रमाण अधिक आहे. यात लग्नाचे बंधन नाही आणि शुगर बेबी एकावेळी अनेक पुरुषांना शुगर डॅडी बनवू शकतात. या नात्याला शुगर रिलेशनशिप असे म्हटले जाते. हे शुगर डॅडी बिझिनेस टूर, व्हेकेशन वर शुगर बेबीना घेऊन जातात. अमेरिका, बिÏटन, ऑस्ट्रेलिया या देशात हे खूळ चांगलेच रूजले आहे असे समजते


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL