गळेकापू स्पर्धेच्या या जमान्यात कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काहीही करू शकतात. कझाकस्तानातील एका कंपनीने केलेल्या अशाच उपद्व्यापामुळे इंटरनेटवर वादळ उठले आहे. या कंपनीने एका जाहिरात आपल्या पÌलाईट अटेंडंट्स (हवाई सुंदरी) नग्न दाखवले आहे.
या वादग्रस्त जाहिरातीत ज्या महिला आणि पुरुष मॉडेल्सना पÌलाईट अटेंडेंट्स म्हणून दाखवण्यात आले आहे, त्यांनी केवळ डोक्यावर टोपी व गल्यात टाय घातली आहे. बाकी शरीरावर एकही कपडा नाही. या जाहिरातीचा व्हिडियो ३१ सेकंदांचा असून त्यातील मॉडेल विचित्र पद्धतीने स्वागत संबोधन करताना दिसतात. त्यामुळे अनेकांनी टीका केली आहे.
एका फेसबुक वापरकर्त्याने ही जाहिरात जुनाट पद्धतीची असल्याची टीका करून यामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का पोचेल, असे म्हटले आहे.
चोकोट्रॅव्हल नावाच्या कंपनीने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. चोकोट्रॅव्हलचे संचालक निकोले मजेंत्सेव यांनी फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे, की हा व्हिडियो बोल्ड आणि शॉकिंग आहे, मात्र त्यातून कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. तरीही कोणाला वाईट वाटत असल्यास आम्ही खेद व्यक्त करतो.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL