जगातील सर्वात लहान फिचर फोन लाँच केला गेला असून झँको टायनी ११ या नावाने तो बाजारात आला आहे. हा फिचर फोन जगातील सर्वात छोटा फोन असून त्याचे वजन फक्त १३ ग्राम आहे व आकार १० रूपयांच्या नाण्यापेक्षा किंचित मोठा आहे. अर्थात या छोटुकल्या फोनवर कॉलिंगसह अनेक सेवा युजरला उपलब्ध आहेत. हा टूजी नेटवर्क फोन आहे. त्याला २०० एमएएमची बॉटरी दिली गेली आहे व तो ३ दिवसाचा स्टँडबाय व ३ तासांचा टॉकटाईम देतो असा कंपनीचा दावा आहे.
या फोनसाठी ६४ बाय ३२ चा ओएलईडी स्क्रीन दिला गेला आहे. या फोनमध्ये ३०० फोन नंबर व ५० एसएमएस सहज स्टोअर होतात. नॅनोसिम साठी कार्ड स्लॉट, मायक्रो यूएसबी लाऊड स्पीकर, ब्ल्यू टूथ अशी फिचर्सही याला दिली गेली आहेत. मे २०१८ पासून तो जगभर उपलब्ध होणार आहे. भारतात या फोनची किंमत २५०० रूपये असेल. युजर हा फोन बॅकअप फोन म्हणूनही वापरू शकणार आहेत.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL