सर्व साधारणपणे आपली अशी भाबडी समजून असते की हलक्या दर्जाचे काही मुलींना उत्तम राहाण्या-जेवण्याची वस्त्र आभूषणांची आणि चैनीची लालूच दाखवून त्यांना त्यांच्या आईबापापासून वेगळे पाडतात आणि वेश्या व्यवसाय स्विकारण्यास लावतात. घरची आर्थिक परिस्थती अत्यंत हलाखीची असल्यांने या पोरीही सहजपणे त्या जाळ्यात अडकतात आणि एकदा या जहरी जाळ्यात अडकल्यानंतर हलक्या दर्जाच्या वेश्यावस्तीतील पिजंऱ्यातच त्यांच्या आयुष्याची इतिश्री होते. कम्युनीस्टांच्या मतप्रणालीप्रमाणे वेश्या व्यवसाय हा आर्थिक विटंबनेचा क्रूर आणि दृष्य परिणाम आहे.
प्रत्यक्षांत काय असते? खरी परिस्थीती अशी आहे की केवळ उदंड पैसा मिळवावा चांगल-चुगंल खाव-प्याव आणि मनोगात व्हावं या कारणांसाठीच स्त्रिया वेश्याव्यवसायाकडे वळत नाहीत. कम्युनिष्टांच्या या व्यवसाया मागे फक्त आर्थिक कारणेच आहेत असं नाही जी काही एकून कारणे आहेत त्यातील आणि तुलनेने गौण असे कारण हे आर्थिक स्वरूपाचे असते. दुसरेही एक महतचे कारण यापाठीमागे असते. विवाहोत्तर काळात ज्या स्त्रियांच्या शरीरीक आणि मानसीक गरजा समाधान कारक रित्या भागविल्या जात नाहीत आणि ज्यांना लैंगीक संदर्भात सतत नाविन्याची वैवीद्याची आवड असते अशा स्त्रिया या व्यवसाचा अंगीकार करतात त्यांना एकाच पुरूषा बरोबर रहायचे जीवावर येते गृहजीवनात त्याच त्या गोष्टी त्या गोष्टी सातत्याने कराव्या लागल्यामुळे त्यांना एकप्रकारेचा कंटाळा येतो. आणि म्हणूनच थोडासा रूची पालट थोडा बदल हवासा वाटतो सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या एकसुरी कौटुंबीक जीवनात काही साहसपूर्ण कृत्य केल्याचे समाधान मिळणे दुर्लभ असते. शिवाय एकाच पुरूषावर सतत अवलंबून रहावं लागत असल्यामुळे ती टोचणारी जाणीव त्यांना क्षणभरही स्वस्थ बसू देत नाही. वेश्यावृत्ती निंद्य मानलेली
आपल्या देशाची संस्कृती अत्यंत प्राचीन आहे आपला समाज ह्याच संस्कृततीने घालून दिलेला दडंक आणि रूढी वर्षानुवर्षे उराशी कवटाळून बसला आहे.याच रूढीपैकी एक रूढ असे म्हणते की समाजात आढळणारी वेश्यावृत्ती हा अत्यंत हलका आणि घाणेरडा व्यवसाय आहे. समाजाला लागलेली ती एक कीड आहे. वेश्याकडे जाणारा पुरूष आपल्या जीवनाची ही बाजू कुणालाही दिसू नये अशा पध्दतीनेच आपली वागणूक ठेवीत असतो. हा व्यवहार तो कुणाचीही भीड न बाळगता करू लागला तर त्याच्या बद्दल कुणीही चांगल बोलत नाही. उलट त्याची निंदा नालस्तीच जास्त होते.
कॉलगर्लचा व्यवसाय परंतु गेल्या काही वर्षात या परिस्थितीत जाणवण्याइतका फरक पडलेला आहे. या संदर्भात एक प्रकारचे सामाजिक परिवर्तनच घडलेले आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
चार भिंती आड जीवन कंठणाचा स्त्रिया जसजशा बाहेरचं जग न्याहाळू लागल्या आहेत. तसतसी त्यांच्या लैंगीक व्यवहारात प्रचंड उलथापालथ घडत आहे जुन्या संस्कृतीचा जुण्या रीतीरिवाजांचा अभिमान धरणाऱया समाजधुरीणांना मुर्च्छाच येईल अशाच प्रकारचे वर्तन आज स्त्रियांकडून घडू लागले आहे.
फोन करताच ‘कँपॅनियन’ हजर! नव्या विचारांचा स्विकार करून त्यांचा आचार घडविणाऱ्या नवनव्या इच्छा जोपवीत रहाणाऱ्या स्त्रीयांचे प्रमाण वाढत चालले आहे. याच स्त्रियापैकी काहींनी ‘कॉलगर्ल’ चा व्यवसाय स्विकारला आहे. त्यामुळे आपल्या तथाकथीत उच्च समाजात एक प्रकारची खळबळ उडाली आहे. एक प्रकारची अस्वस्थता निर्मान झाली आहे. मुंबई कलकत्ता अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुंबई कलकत्ता मद्रास, दिल्ली त्याशिवाय इतर लहाण मोठ्या शहरातील एका विशीष्ट ठिकाणची तुम्हाला माहीती असेल तर नंबर फिरवताच अशा कॉलगर्ल्सची प्रतीनीधी म्हणून काम करणारी एखाद्यी मॉड स्त्री तुमच्या समोर उपस्थित होऊन तुम्हाला कुठल्या प्रकारची ‘कँपॅनियन’ हवी आहे ह्याची चौकशी करते. आणि थोड्याच वेळात एक विलक्षण देखणी व तरूण आणि लैंगीक क्रीडेत अत्यंत पारंगत असलेली स्त्री तुमच्या समोर हजर होते. किंवा आजकाल फोन केल्यानंतर स्वतःच सुंदरी स्त्री तुमच्या पुढ्यात हजर राहते.
कॉलगर्ल्सवर अनेक पुस्तके प्रगसिध्द. कॉलगर्ल्सचा व्यवसाय स्विकारणाऱ्या या स्त्रिया कोण असतात. समाजातल्या नेमक्या कोणत्या कोणत्या घरातून त्या येतात, हे निषिध्द जीवन स्वीकारणे त्यांना कोणत्या कारणांमुळे भाग पडतं. त्यांचे दैनंदीन जीवन कुठल्या प्रकारचे असते. त्यांची आर्थिक प्राप्ती किती हे आणि अशाच स्वरूपाचे अनेक प्रश्न आपल्यासमोर स्वाभाविकपणे निर्मान झालेले असतील.
या सर्व प्रयनांची उत्तरे देणारा आणि कॉलगर्लच्या व्यवसायाविषयीचे कुतुहल शमविणारा एक ग्रंथ काही वर्षापूर्वी प्रसिध्द झाला आहे. त्या ग्रंथाचे नाव ‘लाइफ अँड वर्ल्ड ऑफ कॉलगर्ल च्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा हा पहिला ग्रंथ त्यानंतर अनेक ग्रंथ लिहीले गेले.
या ग्रंथाच्या लेखिका कोणी सामान्य स्त्री नव्हत्या. त्या अव्वल दर्जाच्या समाजशास्त्रज्ञ होत्या आणि समाजातील विविध वर्ग आणि या वर्गाच्या वर्तनांचा वैज्ञानीक अभ्यास हा त्यांचा खास विषय होता
अनेकांची झोप उडेल. साडेतीनशे पृष्ठांच्या या ग्रंथात श्रीमती प्रमीला कपूर यांनी सतरा कॉलगर्लसच्या दैनंदीन आयुष्याचा समग्र अभ्यास करून त्यांच्याकडे येणाऱ्या ‘यजमानांच्याही मुलाखती त्यांनी घेतल्या होत्या.
त्यात एका कॉलगर्लसने असे सांगीतले आहे की जाणून बुजून स्वीकारलेले हे आयुष्य मला मुळीच सोडावेसे वाटत नाही. माझ्या दृष्टीकोणातुन ते उत्तमच आहे. कारण ज्याच्याबरोबर जगणे असह्य होईल अशा पुरूषांचे स्वामीत्व स्वाकारण्याची पाळी माझ्यावर येणार नाही. मला जेजे हवे आहे ते ते या जीवनात सुखाने मिळत आहे. या जीवनात पुरूषाची निवड करायची की नाही ते माझे मीच ठरवणार आहे. पण सध्या ह्याच जीवनात मी आनंदी आहे.
मोना नावाची एक कॉलगर्ल तर स्वतःविषयी खूप रोचक माहीती देते. चोवीस वर्षे वयाची ही कॉलगर्ल अत्यंत सुंदर उंचनीच अत्यंत निरोगी शरीरसंपदा लाभलेली, उन्नत उरोजांची लांब तपकीरी केसांची भावपूर्ण डोळ्यांची कुंदकळ्यासारख्या दातांची होती. असं आकर्षक व्यक्तीमत्व लाभलेली ही मोना ग्रॅज्यूएट होती. तिचे कौटुंबीक जीवन अतिशय सौख्यपूर्ण होते. ती विवाहीतही होती तरीही ती कॉलगर्लचा व्यवसाय करीत होती तरीही ती कॉलगर्लचा व्यवसाय करीत होती. तिची मासिक प्राप्ती तीस चाळीस हजाराच्या आसपास होती.
‘सुहाग’ ऐवजी बलात्काराची रात. तर अशी ही मोना नऊ वर्षाची होती तेंव्हा तिच्या घरातील एका नोकराने तिच्यावर बलात्कार केला होता. तिला पंधरावे वर्ष लागले तेंव्हा तिने घरातच राहणाऱ्या एका पितृतुल्य इसमाशी लैंगीक संबंध जुळवले होते.
लग्नाच्या पहिल्या रात्री पतीशी एकांतात होणाऱ्या पहील्यावहील्या भेटीपूर्वी तिच्या मनात भीषण तुफान उसळलं होतं. लग्नापूर्वी या मीलन रात्री विषयी, शृंगाराविषयी तिच्या मनात काही काव्यमय कल्पना होत्या. त्या रात्री ती स्वतला पतीच्या पायावर काया-वाचा-मनाने वाहून घेणार होती. तिचा पती आपल्या पुरूषी बाहुंच्या विळख्यात कवटाठून तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करणार होता. तिच्या कानांत प्रेमाने गुंजगोष्टी करून तिला आपलंस करून घेणार होता. पण घडले ते वेगळेच ती म्हणते,‘सर्व विधी आवरले आणि आम्ही आता दोघेच उरलो, भरपूर एकांत आणि वेळ होता. परंतु आश्चर्यांची गोष्ट अशी की श्रृंगाराचा कुठलाही प्राथमिक उपचार न करता त्यांने मला खसदिशी खेचून घेतले आणि माझ्या शरीराशी पशुतुल्य संभोग केला. मग मला आठवला तो नोकराने केलेला बलात्कार - ज्यात माझी इच्छा माझा आनंद किंवा माझी तृप्ती यांना काहीही स्थान नव्हते. विवाहीत, अविवाहीत विधवा :
साऱ्याचाच आवडता व्यवसाय सर्वसाधारण वेश्येपेक्षा आज कॉलगर्ल’ ला काहीस उच्च स्थान मिळालेलं आहे. म्हणूनच त्यांच्या धंदा काहीसा तेजीस आहे. तसं पाहील तर बिनभांडवलाचा हा व्यवसाय असला तरी हातात फोन असणे आवश्यक आहे. त्याही पेक्षा आवश्यक आहे ते कमनीय बांधा आणि सौदंर्य ह्या भांडवलाची.
कुणाच्या आधार नसलेल्या विधवा आपल्या सौंदर्याच्या बळावर मुलाबाळांचे पालन पोषण करीत आहे. अविवाहीत तरूणीच्या बाबतीत काही बोलायला नको. हा व्यवसाय करून अमाप. पैसा कमवायचा हर एक प्रकारे आपल्या शरीराची ‘खाज’ भागवायची आणि एखादा ‘सोट्या-गोट्या पकडून त्याच्याशी लग्न करायचे अशी विचार प्रवृती वाढत आहे. तर काही विवाहीत स्त्रिया पतीकडून ते सुख मिळत नाही किंवा मिळत असूनही एक ‘बदल’ म्हणून हा व्यवसाय करू लागल्या आहेत. काही असो हा व्यवसाय तेजीत आहे एवंढं मात्र खरं!
या व्यवसायाचे आवडते आकर्षण या ‘सोफिस्टिकेएड’ वेश्याव्यवसाचे बाह्य स्वरूप एवढे मोहक आणि आकर्षक आहे की अधिकाधिक मुली या व्यवसायाकडे आकर्षीत होत आहेत. सुंदर स्वच्छ अत्याधुनीक सोयीनी परिपूर्ण असलेल्या प्लॅटसमध्ये राहाणाऱ्या या तरूणी फॅशनच्या दृष्टीने ‘परिपूर्ण’ असतात त्यांच्या अंगावरील कपडे अद्यावत असतात. त्या इंग्रजी भाषेत बोलतात. सुशिक्षीत असून पंचतांराकित हाटेल्समधून त्यांचा वावर असतो. त्या नृत्य -समारंभात भाग घेतात. त्यांचा एकून थाट अत्यंत भपकेबाज आणि श्रीमंत असतो त्यामुळे कंटाळवाणे जीवण जगणाऱ्या गृहीणी च्या मनात त्यानी नविन स्पदंने जागृत केली आहेत
त्यांच्या काही खास जागा कॉलगर्लचा व्यवसाय करणाऱ्या तरूणी या साधारणपणे 18 ते 30 वयोगटातील असतात. ईझि मनी’ हे एक जबरदस्त आमिष डोळ्यासमोर दिसत असल्याने त्या या व्यवसायात स्वतला झोकून देतात.
हा व्यवसाय स्विकारल्यानंतर काहींना या व्यवसायाचा तिटकारा वाटू लागतो मग हा आत्मक्लेश विसरण्यासाठी काही अमली पदार्थाचे सेवन करतात. चाळीशी उलटल्यानंतर आपल्या शरीराची किमंत शून्य होणार आहे त्यामुळे आज मिळेल तेवढा पैसा जमविण्याकडे त्यांचा कल असतो त्यामुहेच आपले ‘यजमान’ नशेच्या अमंलाखाली असतात त्याच्याजवळच्या किमंती वस्तू लावण्याच्या मागे असतात.
ज्या तरूणी स्वतःची गिऱहाईके स्वतःच निवडणे पसंद करतात त्या ‘ब्युटी पार्लर’ किंवा अशाच एखाद्या बाह्य निमित्ताने गिऱ्हांईकांना आकर्षीत करीत असतात. यापैकी बहुतेकतरूणी खोट्या नावाने व्यवसाय करतात. ओळखीच्या गिऱ्हांईकाला थेट निमंत्रण असतं. विश्वासू दलालामार्फतच ‘व्यवहार’ ठरविला जातो.
कित्येक तरूणींना गर्भपात करावा लागतो. पण एखाद टक्का तरूणी अनौरस संततीला जन्म देते.
व्यवसायासाठी त्या हॉटेल्स, मोठ्या कंपन्यांची अतिथीग्रहे, बड्या ऑफीसातील खाजगी जागा, गिऱ्हांईकाने स्वतच निवडलेली जागा किंवा स्वतःच्याच घराचा वापर करतात. परंतु बऱ्याचशा कॉलगर्ल स्वतःच्या राहत्या जागेचा वापर व्यवसायासाठी करू देत नाहीत.
ऐशी टक्के गिऱ्हांईके विवाहीत! आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कॉलगर्लकडे येणाऱ्या गिऱ्हांईकापैंकी ऐशी टक्के गिऱ्हांईके ही विवाहीत असतात. ज्या समाजातील एवढा वर्ग चोरून म्हणा वा राजरोस म्हणा विवाहबाह्य संबंध ठेवतो त्या समाजातील कौंटुंबीक जीवनात किंवा विवाहपध्दतीस काही मूलभूत उणीवा निर्माण झाल्या असल्या पाहीजेत कदाचीत एकमेकांना सर्वस्वी अनोळखी असणारे तरूण स्त्री-पुरूष अचानक एका रात्री काही क्षणांच्या सहवासाकरीता एकत्र येतात. एकमेकांच्या उबदार सानिध्यात लैंगीक आनंद मनपूर्वक लूटतात आणि सकाळी पून्हा कुठल्या ही जबाबदारी शिवाय आपापल्या रस्त्याने निघून जातात.
सारेच प्रतिष्ठीत ! या कॉलगर्ल्सच्या गिऱ्हांईकांमध्ये सामान्यत मोठ मोठ्या कंपनीतील एक्झीक्युटिव्हज सरकारी अधिकारी राजकीय पुढारी आणि व्यापारी यांचाच अधिकर भरणा असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे अशा गोष्टीवर खर्च करण्यासाठी त्यांच्याजवळ दोन नंबरचा बेहीशोबी पैसा मुबलक प्रमाणात उपलब्द असतो. कॉलगर्लचे ‘गिऱ्हांईक’ झाल्यांने त्यांचा सामाजिक प्रतीष्ठेला किंवा मानसन्मानाला कुठल्याही प्रकारची हानी पोहत नाही.
त्यामुळे कॉलगर्लसच्या गिऱ्हांईकांमध्ये दिवसेदिवस वाढ होत आहे. भरमसाठ पैसा त्या घेत असूनही त्यांच्याकडे जाणाऱ्याची संख्या कमी न होता उलट ती वाढतच आहे.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL