उर्दू भाषेतील अमर शायर मीर तकी ‘मीर’ वास्तव जीवन जगले होते... त्यांनी आपलं वास्तव जीवन आपल्या आत्मकथेत मांडलं आहे. इसवी सन 1730 साली आपल्या घरातल्या गरिबीला कंटाळून मीर किर्ती आणि पैशासाठी मोगलांचं राज्य असलेल्या राजधानी दिललत आला. तो रंगेल वृत्तीचा तरुण होता. दारु आणि बाईचा तो फारच शौकीन होता. आपल्या रंगेलपणाच्या घटना त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या आत्मचरित्रात लिहिल्या आहेत. मीरने जेव्हा दिललत पाऊल टाकले तेव्हा त्याच्या खिशात फुटकी कवडीही नव्हती. मोगल सम्राटाच्या दरबारात भालदार-चोपदारचे काम करणाऱ्या नवाब रईसने मीरला दिललत येण्यास निमंत्रण दिले होते, त्यानेच त्याच्या राहण्याची व्यवस्था चावडी बाजारातील एका घरात केली होती. ज्या दिवशी सकाळी मीर दिललत पोहचला त्याच दिवसाच्या संध्याकाळी शेरो-शायरीची मोठी मैफिल आयोजण्यात आली होती. त्या मैफिलीत भाग घेण्यासाठी नामवंत व सुप्रसिध्द शायर उपस्थित होणार होते. मीर शेर-शायरी व गझल रचतो हे नवाब रईसला ठाऊक होते. मीरने त्या मैफिलीत भाग घेऊन आपल्या उत्तम रचना पेश केल्या तर बक्षिसीच्या स्वरुपात मिळणाऱ्या पैशातून तो आपल्या महिन्याचा रोजी रोटीचा प्रश्न सोडवू शकतो असे नवाब रईसने त्याला सांगितले. मोठ्या थाटामाटात आयोजित केलेल्या मैफिलीत आमंत्रीत शायरांसाठी जसा काही भोजनाचा बंदोबस्त करण्यात आला होता, तशीच उच्च प्रतीच्या मद्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्या मद्याच्या जाळ्यात टाकण्यासाठी खास हिमालयातून बर्फ मागविण्यात आला होता. यावरुन ती मैफिल कशी शाही थाटामाटाची होती याची कल्पना येईल. शेरो-शायरीची मैफिल जेव्हा संपली तेव्हा मध्य रात्र केव्हाच उलटून गेली होती. आकाशात पौर्णिमेचा चंद्र झाकाळत होता. मीरच्या मस्तकात मद्याची धुंदी होती, तर त्याच्या सदऱ्याच्या दोनही खिशात भरभरुन चांदीची नाणी खणखणत होती. खिशात पैसा खुळखुळायला लागताच मीरचा मूळचा रंगेल स्वभाव उचंबळू लागला होता. नाचणाऱ्या-गाणाऱ्या गणिकांची वस्ती तिथे कुठे आहे याची त्यांनी लोकांकडे चौकशी केली. तेव्हा त्याला कळले की दिललच्या ‘हौजकाजी’ गललत सुंदर आणि मादक देहाच्या गणिका राहतात. ती माहिती मिळताच मीरची पावले चावडी बाजारातील आपल्या घराकडे न वळता हौजकाजी गललकडे वळली. हौजकाजीच्या गललतील एका माडीत तो गेला. तिथे एका तेरा-चौदा वर्षाच्या चंद्रमुखी चेहऱ्याच्या तरुणीकडे तो आकर्षित झाला. त्या कोठ्याच्या मालकिणीने मीरशी सौदा पक्का केला. पानाचा विडा त्याच्या हातावर ठेवीत ती म्हणाली, ‘हा विडा खाल्ल्यानंतर आपणास कामक्रिडेत इतकं सुख प्राप्त होईल की सुखाच्या प्राप्तीसाठी तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्या कोठ्याकडे याल!’ मीरने आपल्या चरित्रात स्पष्टपणे लिहिले की, त्या मालकिणीने केलेला दावा खरा ठरला होता. स्त्री समागमाचं सुख यापूर्वी त्याने कधीच अनुभवलं नव्हतं. मीरच्या अंदाजानुसार जवळ जवळ एक तासानंतर तो तणावमुक्त झाला तेव्हा ती किशोर वयीन वेश्या नखशिखांत घामाने डबडबलेली होती. ती अशाप्रकारे तोंडावाटे दम टाकीत होती जणू तिने एकाच चालात कुतुब मिनारचा शेवटचा टप्पा वर चढून आली असावी. ‘मीर तकी’ मीर’ जेव्हा आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या सदऱ्याचे दोनही खिसे रिकामे झालेले होते. खिशातील काही रक्कम त्याने खुष होऊन त्या कोठा मालकिणीला दिली होती तर उरलेली रक्कम त्या किशोरवयीन तरुणीने गुपचूप काढून घेतली होती. आपण एका रात्रीत कमावलेली भरमसाठ रक्कम एका वेश्येसाठी उडवून टाकली म्हणून त्याला किंचितही दुःख झाले नव्हते किंवा पश्चातापही वाटला नव्हता. आपल्या हृदयस्पर्शी आणि दर्दिल्या शेरे-शायरीने मीर जेव्हा जेव्हा मैफिली जिंकायचा तेव्हा तेव्हा त्याच्या खिशात भरपूर पैसा यायचा, पण हातात पैसा घेताच मीरची पावले हौजकाजी गललकडे वळायची व तो त्या कोठेवाल्या मालकिणीकडून पानाचा विडा खावून सहवासाचा आनंद मनसोक्तपणे उपभोगीत होता. कोठा मालकिणीने दिलेले पान खाल्ल्यानंतर आपली स्तंभन शक्ती कशी काय वाढते? ती पानात अशी कोणती वस्तू घालते ज्यामुळे त्याची स्खलन शक्ती लांबविली जाते? याचं कोडं त्याला उमजेना. गिऱ्हाईकांना आपल्या कोठ्याकडे आकर्षित करण्याचं रहस्य कशात दडलं आहे हे ती त्याला सांगायला दुधखुळी नव्हती. तरी देखील मीरने अनेक प्रयत्न केल्यानंतर त्याला ते रहस्य उमजलं होतं. त्या पानाच्या विड्यामध्ये एक तर ‘अश्वगंधा’ नावाची देशी बूटी व दुसरी म्हणजे ‘कोहफत’ नावाच्या झाडाची सुकलेली मुळी! जी फक्त अफगाणिस्तानच्या बर्फाळ प्रदेशात प्राप्त होते. सहवासाचा खराखुरा आनंद अद्भूत असतो परंतू काही दुर्दैवी पुरुषांना तो प्राप्त करता येत नाही. जगातील प्रत्येक देशात सभ्यता आणि काळानुसार सेक्ससंबंधी प्रयोग आणि अभ्यास करण्यात आला आहे. या सर्व शास्त्रज्ञांचा उद्देश एकच होता की, सेक्सचा आनंद आणि आकर्षण जास्तीत जास्त कसे वाढवता येईल. अशा औषधांचा, फॉर्म्युल्यांचा, आसनांचा आणि व्यायामांचा शोध चिरकालापासून आजपर्यंत चालू आहे. ज्या संशोधनापासून कर्त्याचे लैंगिक उत्थान अधिकाहून अधिक प्रदीर्घ काळासाठी टिकून राहील व त्याचा सेक्सचा आनंद अत्युच्च बिंदूच्या पराकोटीला पोहचू शकेल. त्याशिवाय त्याच्या मनात सेक्सविषयी इतकी उत्कंठा निर्माण व्हायला हवी की त्याच्या मनात इच्छा असूनही तो सेक्स बाबतीत उपेक्षा किंवा नकार देऊ शकत नाही. या एकाच लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी तज्ञांनी केलेल्या संशोधनानंतर कबूल केले की, सेक्स जीवनाच्या प्रत्येक क्रियेत आणि प्रत्येक वस्तूमध्ये व्याप्त आहे. स्त्री स्वतला नटवते-सजवते त्यामागे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या ती आपल्या कामुक भावना व्यक्त करीत असते. पुरुष जेव्हा आपल्या शक्तीचं प्रदर्शन करीत असतो त्यामागची अधिक भावना सेक्स व्यक्त करण्याची असते. लैंगिक शक्ती आणि आनंद मानवाला मिळावा म्हणून जगभरात केले गेलेले संशोधन आणि त्यातून निघालेले निष्कर्ष काही सत्यात उतरले तर काही बिन बुडाचे निघाले. यावरुन आपण ठामपणे सांगू शकतो की, लैंगिक शक्ती आणि आनंद याचा अंतिम निष्कर्ष आतापर्यंत निघालेला नाही. सेक्स लांबविण्याचे शोध कार्य जसे भुतकाळात केले गेले. वर्तमानकाळात चालू आहे. तसे भविष्यकाळातही चालू राहील. या बाबतीत ठाम निष्कर्ष कदाचित संशोधकांना सापडणारही नाहीत. ‘वियाग्रा’ चंच उदाहरण घ्या. या औषधाला तयार करणाऱ्या कंपनीने काही वेळातच करोडो रुपयांची कमाई केली. त्याचा काळाबाजारही झाला. वियाग्रा सारखी नकली औषधे कितीतरी बाजारात आली. तरी देखील त्या औषधाच्या खात्रीबद्दल आजही वाद-विवाद चालू आहेत. कोण म्हणतं वियाग्राने स्तंभन शक्ती खरोखरच वाढते तर कोण म्हणतं की, वियाग्रा फालतू आहे. विशेषज्ञांचं मत असं आहे की वियाग्रा घेतल्याने जर त्या पुरुषाला लाभ होत असेल तर ते केवळ मनोवैज्ञानिक प्रभावामुळेच! कॅप्सूलमध्ये पाणी भरुन सेक्स टॉनिक म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार केला तर कॅप्सूल घेणाऱ्या पुरुषाला केवळ मनोवैज्ञानिक प्रभावामुळे त्याची स्तंभन शक्ती लांबवली जाते. अमेरिकेचे प्रतिष्ठीत लैंगिक विशेषज्ञ डॉ. साइमन हैजेल ‘वियाग्रा’ च्या संदर्भात म्हणतात की, ‘चीनमध्ये जसे शेकडो सेक्स टोटक शेकडो वर्षापासून चालत आलेली आहेत त्यातीलच ‘वियाग्रा’ हा एक प्रकार आहे. वियाग्रामध्ये जे विशेष तत्व वापरण्यात येते ते चीनमध्ये सापडणाऱया ‘गिशिंग’ नावाच्या झाडाच्या मुळापासून तयार करण्यात येते. ह्या झाडाच्या मुळ्या आकाराने दिसायला स्त्री देहासारख्या असतात. अज्ञात काळापासून लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी चीनमध्ये ज्या ‘गिशिंग’ च्या मुळ्यांचा वापर केला जातो त्या मुळ्या केवळ नग्न स्त्री देहासारख्या दिसतात. या विकृत भावनेपोटी तर त्याचा उपयोग केला जात असावा का? असा एक प्रश्न निर्माण होतो. या मुळ्यांमधील सारे गुण संदिग्ध आहेत. ‘गिशिंग’ अथवा ‘गिजिंग’ या नावाने प्रचलित असलेली ही औषधे प्रक्रिया करुन बाजारात विकली जात आहेत त्याचा प्रभाव असो वा नसो. परंतू या मुळ्यांचा प्रयोग मूळ स्वरुपात केल्यास तो निश्चितपणे प्रभावी ठरतो असे अनुभवी लोकांचे मत आहे. चीनमधील स्त्री-पुरुष सेक्सकडे मोठ्या गहन आणि गंभीर दृष्टीने पाहात असल्याचे दिसून येते. ‘कामसूत्र’ सारखं काम साहित्य चीनमध्ये देखील लिहिलं गेलं आहे. त्याचबरोबर लैंगिक शक्ती वाढविणारे टोटको, लोकांचा विश्वास असलेले व लैंगिक समस्या सोडविण्यासाठी उपयोगात येणारे व्यायाम व योगाची पुस्तकेही भरमसाठ बाजारात उपलब्ध आहेत. वात्सायनाने लिहिलेल्या कोकशास्त्रात चौऱयाऐंशी कामकलांचा उलल्sख सापडतो. परंतू चीनचा प्राचिन लैंगिक तज्ञ (वैध) ‘हुआ-ची-फुन’ याने लिहिलेल्या लैंगिक ज्ञान पुस्तकात (इंग्रजी नाव : 375 हैवेंस फॉर द किंग) संभोगाचे 375 आसनांचे प्रकार दाखवलेले आहेत. हुआ-ची-फुन हा तेराव्या शतकात चीनी सम्राट ‘फा-म्यान’ याच्या दरबारात प्रमुख वैद्यराज होता. सम्राटाला संभोगातील नवनवीन प्रकार दाखवून देण्याचे तो काम करीत होता. प्राचीन काळातील चीनमध्ये प्रत्येक सम्राटांच्या किंवा राजांच्या जनानखान्यात शेकडो राण्या आणि रखेल होत्या. त्या सर्वांना पुरुन उरायचं म्हणजे त्या सम्राटाच्या डोक्याला मोठा मनस्ताप वाटायचा. यासाठी असे राजे महाराजे आपल्या दरबारात लैंगिक भावनात पारंगत असलेले वैद्यराज बाळगत असत. राजाश्रय लाभलेले असे वैद्यराज लैंगिक स्तंभन शक्ती वाढविणाऱया उपयांवर वेगवेगळे प्रयोग करीत असत. त्या प्रयोगासाठी ते अनुभवी वेश्यांची मदत घेत. त्या वेशांसोबत ते स्वत प्रथम तो प्रयोग अंमलात आणीत असत. त्यानंतरच त्या प्रयोगाचे गुढ आपल्या सम्राटांना समजावून सांगत. हुआ-ची-फुन यांनी आपल्या लैंगिक ज्ञान पुस्तकात 375 हैवेंस फॉर द किंग उल्लेख केला आहे. ती सारी आसने सम्राट ‘फा-म्यान’ याने जनानखान्यातील स्त्रियांवर वापरली होती. ‘गिशिंग’ च्या शिवाय चीनमध्ये वर्तमान काळात लैंगिक शक्ती वाढविण्याऱया औषधांची किंवा टॉनिकची जर सूची काढली तर ती एक मोठी नामावलीच होईल. परंतू काही चीनी लोक आपली लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी ‘चमागदड’ किंवा विशेष जातीच्या हिरव्या सर्पाचे रक्त पितात. चीनच्या काही विशिष्ट विभागामध्ये कोंबडीचे अंडे प्रभावशाली मानले जाते. ज्या अंड्यामध्ये भ्रूण विकसित झालेले असते ते अंडे कच्चे खाल असता लैंगिक शक्ती वाढते असा त्यांचा समज आहे. आपली स्तंभन शक्ती लांबविता यावी म्हणून चीनी पुरुष आपल्या पत्नीला किंवा प्रेमिकेला मिलनासाठी भेटण्यापूर्वी आदल्या रात्री आपल्या शिश्नावर मिस्त्री मम्मीप्रमाणे ढिगभर कापडाच्या पट्ट्या बांधून घेत असतो. मिलनापूर्वी त्याची जोडीदारीण त्याच्या शिश्नावरच्या पट्ट्या हळूहळू सोडविते. या सोडविण्याच्या कार्याला तिला जवळ जवळ अर्धा तास तरी लागतो. जोडीदारणीच्या होणाऱया बोटांच्या नाजूक स्पर्शाने त्याच्या देहात जे रोमांच निर्माण होतात ते शरीर सहवासाच्या सुखापेक्षा मजेदार असतात. चीन आणि जपानी ललना जेव्हा आपल्या जोडीदाराकडे सहवास करण्यासाठी भेटायला जातात तेव्हा देहावर एकावर एक असे अनेक कपडे चढवून जात असतात. तेव्हा मिलनासाठी उत्सुक झालेला पुरुष जेव्हा तिचे एक एक वस्त्र उतरवतो तेव्हा त्याच्या खट्याळ हाताच्या स्पर्शाने ती कामोत्तेजित होते. आजही चीनी किंवा जपानी स्त्री-पुरुष प्रणयराधनेच्या पूर्वी जुन्या चालीरीतींचा मार्ग स्वीकारतात. भारतात कामसूत्राची निर्मिती झाली तिथून मोगलांचं राज्य येईपर्यंत मधल्या कालावधीत कामक्रिडेवर नव नवे प्रयोग करण्यात आले. अठराव्या व एकोणीसाव्या शतकात हैद्राबाद मधील हकीम-वैद्यांकडून लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी अनेक उपाय सुचविले गेले. ते सारे उपाय आज हास्यास्पद वाटतात. काही लोकांचा असा विश्वास होता की, शिश्नावर तारकोल लावून संसर्ग केल्यास स्तंभन शक्ती लांबविली जातेच शिवाय स्त्रीला गर्भधारणेची शक्यता नसते. त्या काळी आलसीर्च्या तेलाने शिश्नाचे मालीश केले असता स्तंभन शक्ती वाढविण्यास ते प्रभावी असल्याचे समजले जात होते. लखनऊचा रसिकपणा सर्वांना ठाऊकच आहे. काळ्या उडदाच्या डाळीचा बनविलेला हलवा स्तंभन शक्ती वाढविण्यास लाभदायक ठरतो असे म्हणतात. ज्या रात्री त्यांना संभोग करायचा असतो त्या रात्रीच्या जेवणात काळ्या उडदाची डाळ किंवा तिच्यापासून तयार करण्यात आलेला हलवा मुद्दामहून खात असत. शय्यासोबत करायला जाण्यापूर्वी ते दूधही पीत असत. अश्वगंधा व अनेक जडी-बूटी आश्चर्यजनक स्तंभन शक्ती वाढविण्यास कारणीभूत ठरतात याची प्रचिती त्यांना येऊ लागली. कामशक्ती वाढविणारी प्रभावी जडी बूटीमध्ये अश्वगंधाला अधिक महत्व दिले जाते. प्राचीन लैंगिकतेच्या समस्यांमध्ये विद्वान असलेला वृक्षबाहु म्हणतो की, ‘अश्वगंधाचा प्रयोग सतत महिनाभर करीत राहिलेला पुरुष मानव जातीच्या लैंगिक संबंधात अश्वासारखा तो शक्तिशाली ठरतो. पूर्वीचे नवाब किंवा राज्यकर्ते लैंगिक शिक्षणाला चीनी सम्राटाएवढेच महत्व देत होते. लैंगिक शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून प्रतिष्ठीत समजणाऱया घराण्यामध्ये वेश्यांना अधिक प्राधान्य दिले जात असे. अशा कित्येक वेश्यांची त्या घराण्याशी बांधिलकी होती ज्यांनी प्रत्येक पिढीतील वयात येणाऱया तरुणांना लैंगिक शिक्षण देऊन कामकलेमध्ये पारंगत केले होते. आपल्याकडे सेक्सच्या संदर्भात तंत्रविद्येलाही प्रभावी माध्यम समजले गेले होते. सिद्धी प्राप्त झालेला मांत्रिक जेवढा स्त्री संसर्गामध्ये सेक्स लांबवितो तेवढा सर्वसामान्य पुरुष कधीच लांबवू शकत नाही. ओशोने याच प्राचिन विद्येला आपल्या पद्धतीनुसार लैंगिक उद्देशासाठी विकसीत केले. त्यांच्या शिष्यांचा इतका ठामपणे दावा आहे की, ‘ओशो द्वारा प्राप्त झालेल्या तंत्रानुसार आम्ही सुंदर तरुणींच्या मृतदेहाशी सफलतापूर्वक संभोग घेतला आहे. जो स्वर्गीय सुखाचा आनंद लोकं संबोधतात तो आनंद आम्हाला कधी जीवंत स्त्री पासून मिळाला नाही तोच आनंद आम्ही मृत स्त्री देहाकडून प्राप्त केला आहे.’ अघोरी पंथाच्या साधकाला कामवासना जागृत झाल्या असताना एखादी जिवंत स्त्री उपलब्ध होऊ शकली नाही तर ते पद्मासनात ध्यानस्थ असतात व मंत्र सामर्थ्याने आपल्याला आवडणाऱ्या स्त्री मृतदेहाला पाचारण करतात. हा सारा अनुभव वास्तविकता आणि कल्पना या स्थितीमधील असतो. ज्यांनी या अद्भूततेचा अनुभव घेतला आहे ते आपला अनुभव कथन करताना सांगतात की, ‘स्त्री देहाचा तो मृतदेह शिश्नाला स्पर्श देखील करीत नाही. परंतू तरीदेखील शरीरात सुख संवेदनाच्या इतक्या लहरी उसळतात की त्यावर आवर घालणं सर्वसामान्यांना कठीण जाईल. परंतू तांत्रिकांचा मनावर संयम असल्यामुळे ते आपल्या कामभावनांवर नियंत्रण करु शकतात व त्या मृत देहापासून मिळणाऱ्या सुखाचा आनंद घेत आपल्या इच्छेनुसार उत्कट बिंदू साधून घेतात... त्यानंतरच त्यांचे स्खलन होते. एका तांत्रिकाच्या दृष्टीकोनातून सेक्स ही वासना नसून आत्मीय आनंदाला उच्चतम शिखरावर घेऊन जाणारी ती साधना आहे. तंत्र विज्ञान सांगतं की स्वतःच्या देहाला सेक्सपासून वंचित ठेवून तुम्हाला केव्हाही निर्वाण प्राप्त होऊ शकत नाही. आपल्याला मुक्ती प्राप्ती करायची असेल तर संभोगाचा आनंद घ्यावाच लागेल. ज्यांनी तंत्र साधनेचा अभ्यास केला आहे ते आपल्याला झालेल्या ज्ञान प्राप्तीवरुन सांगतात की, ‘तांत्रिक सेक्स मनुष्याला लैंगिक आनंदापेक्षाही पुढच्या मार्गाला नेत असतो ज्या आनंदाला ते परम अवस्था मानतात.’ ‘ए प्रॅक्टीकल गाइड टु लव मेकिंग सीक्रेटस्’ या पुस्तकाचे लेखक डेविड रैम्सडेल म्हणतात की तांत्रिक सेक्स करण्यासाठी आपल्यामध्ये स्वचेतना असणे जरुरीचे आहे. ‘मानसिक आणि भावनात्मक स्थिरता ध्यानाद्वारे मन शांत ठेवण्याची क्षमता आणि सेक्सच्या अध्यात्मिक प्रयोगाचा अनुभव करण्याची उत्सुकता या गोष्टी तांत्रिक सेक्स सफल होण्यासाठी आवश्यक आहेत.’ यामुळेच तांत्रिक सेक्सचा अनुभव घेणाऱ्याना अध्यात्मिक आणि पवित्र मानले जाते. तांत्रिक सेक्समध्ये जोडपी चेतनेच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचण्याच्या उद्देशाने एकमेकांना भेटतात. यात सेक्स करण्याचा उद्देश हा संतान प्राप्तीसाठी किंवा शारीरिक सुख मिळविण्यासाठी नसतो. रैम्सडेलच्या म्हणण्यानुसार तांत्रिक सेक्समध्ये स्त्री-पुरुष एकमेकांची पूजा करतात. यात स्त्री ही शक्तीचे रुप असते तर पुरुष अलौकिक चेतनेची आदर्श अभिव्यक्ती करतो. जपानमध्ये लैंगिक संबंधामधील एक खास प्रकाराला ‘कोकीगामी’ असे म्हटले जाते. बाराव्या शतकापर्यंत जपानच्या उच्च वर्गीय लोकांमध्ये याला आध्यात्मिक आनंद मिळविण्याचा मार्ग मानले जाई. जपानच्या बाहेरील लोकांना भले ही गोष्ट हास्यास्पद वाटत असे पण जपानी समाजाने मात्र कोकीगामी हा प्रकार गंभीरतेने घेतला होता. कोकीगामीत कागदापासून मासे, ड्रगन्स, ऑक्टोपस असे प्राणी बनवले जात. पुरुष ते शिश्नावर धारण करीत असत. पण त्यापूर्वी स्त्रीला विचारणे आवश्यक असे की तिला कोणता प्राणी आवडतो. हा एक अशा प्रकारचा लैंगिक संबंध होता ज्यात स्त्री-पुरुष दोघांचा सम सहभाग आवश्यक होता. जपानी उच्च समाजात लैंगिक संबंधाबाबत येणारा एकसुरीपणा टाळण्यासाठी कोकीगामी हा सर्वात प्रभावी उपाय मानला जात असे. याचा योग्य तऱहेने वापर केल्यास दीर्घ काळपर्यंत लैंगिक सुखाचा आनंद घेता येत असे. पुरुष जो प्राणी आपल्या शिश्नावर धारण करीत असे त्या प्राण्याचे हावभाव देखील करत असे. त्याचबरोबर स्त्री-पुरुषांत संवाद देखील होत असे. पुरुष त्या विशिष्ट प्राण्याचा आवाज काढत असे आणि स्त्री त्याला प्रत्युत्तर देई. या प्रकारे कोकीगामीचा हा खेळ दोघांमध्ये हसत-खेळत खेळला जाई. शेवटी जेव्हा ते मिलनाच्या स्थितीत येत तेव्हा दोघेही तणावमुक्त असत. ओशोंनी म्हटलंच आहे की, ‘ज्या प्रणयात हृदयात निघालेले हास्य सामील असेल तो प्रणय सर्वोत्तम होय.’ प्राचीन मेक्सिकन लोकांत नृत्य हा प्रकार सेक्सचा एक महत्वपूर्ण भाग होता. आज पण मेक्सिकोतील आदिवासींनी ही परंपरा जपली आहे. संभोगापूर्वी नृत्य करताना जोडपी शरीराच्या प्रत्येक भागाला एकमेकांचा स्पर्श करीत असत. तोंडाला तोंड, छातीला छाती, कंबरेला कंबर, पायाला पाय इ. या नाचात असे वाटत असे की जोडपी एकमेकांत सामावून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच नृत्याला नंतर पाश्चात्य समाजाने ‘टैंगो’ हे नाव देऊन फॅशनच्या नावाखाली आपलेसे केले. अमेरिकेच्या मुक्त वातावरणात सेक्स संबंधात जे प्रयोग झाले आहेत ते आपल्या नजरेला भले विचित्र वाटतील पण तेथील लोकांचे म्हणणे आहे की या प्रयोगांमुळे लैंगिक सुखाचा आनंद खरोखरच वाढतो. उदा. मुख मैथुनाच्या उद्देशाने गुप्तांगावर चॉकलेट किंवा फळांचा गर लावून तो चाटणे. आरोग्य तज्ञांच्या मते या क्रियेने संसर्ग फैलावू शकतो पण अमेरिकेतील तरुण पिढीत ही एक नित्याची बाब आहे. संभोगापूर्वी योनीभाग दारुने भिजवणे ही देखील एक साधारण लैंगिक क्रिया आहे. लोकांचा असा समज आहे की दारुमुळे योनीचे स्नायू आकुंचन पावतात त्यामुळे लैंगिक सुखाचा आनंद वाढतो. आपल्याकडच्या लोकांमध्ये देखील असा विश्वास आहे की दारुने स्नान केल्यास स्त्रीचे सौंदर्य आणि तारुण्य झळाळून उठतेच पण स्त्रीचा योनिमार्ग नेहमीच आकुंचन स्थितीत राहतो. ही सामान्य लोकांची धारणा झाली पण तज्ञांच्या मते ही गोष्ट आरोग्यासाठी हानीकारक आहे. वर्तमान पाश्चात्य जगतात संभोगा दरम्यान स्त्रियांनी जोरजोरात ओरडणे आणि सुस्कारे सोडणे लैंगिक क्रियेत उत्तेजक मानले जातात. लोक असेही समजतात की लैंगिक उत्तेजनेत स्त्रिया जितक्या जोराने ओरडतात तेवढी त्यांची लैंगिक उत्तेजना नसते. आपल्या जोडीदाराला आवडेल म्हणून त्या असे करीत असतात. अशा ओरडण्याला ‘फेक ऑरगेज्म’ म्हटले जाते. स्वतःला आधुनिक म्हणवणारे शौकिन आपल्या स्नानगृहाला लैंगिक सुख घेण्यासाठी आदर्श जागा मानतात. थंड किंवा शीतल पाण्याच्या धारेखाली सेक्सची गोडी वाटू शकते. परंतू ते स्त्रीच्या लैंगिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. पाण्याची तीक्ष्ण धार स्त्रीच्या योनिमार्गातील नैसर्गिक स्त्राव नष्ट करु शकते. परिणामी लैंगिक सुख घेणे स्त्रीसाठी त्रासदायक ठरु शकते. अमेरिकी आदिवासींसाठी सेक्स ही एक सतत बदलणारी क्रिया आहे. ते एकाच वेळी जास्तीत जास्त आसनांचा आनंद घेणे पसंत करतात. नृत्यप्रेमी रेड इंडियनांसाठी वास्तवात सेक्स देखील एक नृत्याचा प्रकार आहे जो आरंभापासून शेवटापर्यंत एकाच प्रकारे केला जात नाही. ‘कोरियाच्या लैंगिक तज्ञांचे ‘निरोध’ च्या वापराबाबत म्हणणे असे की, जे पुरुष कुटुंब नियोजनाच्या उद्देशाने निरोधचा वापर न करता स्खलन बिंदू गाठण्यापूर्वी आपले शिश्न योनी मार्गातून बाहेर काढतात, ते आपल्या स्त्रीला दुखावतात. अशा पुरुषांच्या स्त्रिया नेहमीच असंतुष्ट राहतात आणि लैंगिक सुख घेण्याची त्यांची इच्छा कमी होत जाते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार वीर्यस्खलन हे योनी मार्गातच व्हायला हवे हे पुरुषांनी विसरता कामा नये. योनीमार्गात होणाऱ्या वीर्यस्खलनामुळे स्त्रीला लैंगिक सुखाचा आनंद मिळविता येतो. कोरियन तज्ञांच्या या म्हणण्याचा संदर्भ तेथील प्राचीन स्थानिक लैंगिक परंपरेशी जोडलेला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत तेथे असा समज होता की, जो पुरुष स्त्रीच्या बाहेर स्खलीत होतो तो आपल्या स्त्रीवर प्रेम करत नाही. प्राचीन कोरियाच्या कायद्यानुसार अशा पुरुषांच्या पत्नीला त्यांच्याशी असलेले आपले संबंध संपुष्टात आणण्याचा अधिकार होता. कोरियात नैसर्गिक समागमा व्यतिरिक्त वीर्याचे स्खलन अधार्मिक मानले जाई. तेथे समलैंगिक तसेच हस्तमैथुन करणाऱ्याना पकडले गेल्यास किंवा स्त्रीने तक्रार केल्यास कठोर दंड केला जाई. पतीचे घर, संपत्ती तथा वीर्यावर देखील पत्नीचा अधिकार आहे. जे पती आपल्या इच्छेनुसार वाया घालवू शकत नाही असे समजले जाई. मागील शतकापर्यंत जपानमध्ये उवानचा जमातीत विवाहाची प्रथा नव्हती. लैंगिक संबंध बिनदिक्कत चालू होते. असा स्वैराचार अन्य अनेक जमातींमध्ये देखील चालू होता. परंतू एका बेटावरील जमातीमध्ये एक खास बाब होती की, मुलगी जेव्हा पहिल्यांदा कोणाशी शारीरिक संबंध स्थापित करायची तेव्हा मोठा समारंभ साजरा केला जात असे. यात मुलगी आणि तिचा प्रथम प्रेमी आपले नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांसमोर एक खास नृत्य सादर करत. या नृत्यात ते प्रथम सहवासाच्या वेळेस केलेल्या क्रिडांचे प्रदर्शन करीत. वर्तमान जपानी कायद्यानुसार यास प्रतिबंध केला आहे. परंतू आजही जपानमध्ये कैक ठिकाणी गुप्तरुपात असले सोहळे साजरे केले जातात. स्वतःला साज-श्रृंगार करुन विरुद्ध लिंगी व्यक्तीला आकर्षित करुन घेण्याची वृत्ती जगात आजही सर्वत्र पसरलेली आहे. साजय्शृंगाराची गोष्ट निघते तेव्हा शरीराबरोबरच लैंगिक अवयवांना देखील आकर्षकरित्या सादर का करु नये असे समजणाऱ्याची समाजात कमी नाही. दक्षिण अमेरिकेतील जंगलात राहणाऱ्या एका जमातीतील पुरुष सर्वात जास्त आपल्या लिंगाच्या सजावटीवर लक्ष देतात. या जमातीत कपडे घालण्याची प्रथा नाही. पुरुष आपल्या लिंगाला वेताच्या पोकळ नळीत लपवून ठेवतात आणि गरजेच्या वेळी बाहेर काढतात. ते लाजेने असे करीत नसून आपले लिंग वेताच्या बांबूसारखे लांब आणि सुदृढ आहे आणि नेहमी संभोगासाठी तयार आहे हे स्त्रियांना दाखवून देण्याचा त्यांचा हेतू असतो. वेताच्या पोकळीत लिंग ठेवणे ही एक प्रतिकात्मक गोष्ट होती. तेथील पुरुषांना समान लांबीची नळी वापरण्याची मुभा नव्हती. सामाजिक स्तरानुसार नळीची लांबी ठरत असते. जमातीच्या सरदाराची नळी सर्वात मोठी असे. ऑस्ट्रेलियाच्या मूळ रहिवाशांसाठी सेक्स नेहमी धार्मिक गोष्टींशी निगडीत राहिला आहे. त्यांच्या मते स्त्री ही एका खडकाप्रमाणे असते आणि पुरुष म्हणजे त्या खडकावर धडक मारणारा मेंढा. एकमेकांना लैंगिक उत्तेजना आणि आनंद प्रदान करण्याचा त्यांचा एक वेगळाच प्रकार होता. विवाहापूर्वी लैंगिक अवयवांमध्ये केस कापण्याला मनाई आहे. स्त्री-पुरुष मिलनाच्या रात्रीसाठी ते केस राखून ठेवतात. या रात्री सर्वात प्रथम ते एकमेकांचे केस साफ करतात आणि यासाठी ते भरपूर वेळ खर्च करतात. ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांमध्ये लैंगिक अवयवांजवळ केस असणे हे कौमार्याचे आणि केस नसणे हे वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जाई. विवाहापूर्वी कौमार्य अबाधीत राखण्याला महत्व दिले जाई. जर कोणा स्त्री-पुरुषाचे लैंगिक अवयवांजवळ केस न आढळल्यास त्यांना जमातीमधून आणि वस्तीमधून हद्दपार केले जाई. वास्तवात लैंगिक अवयवांजवळच्या केसांबद्दल जगातील वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या समजूती दृढ आहेत. प्राचीन ग्रीक मूर्तीचे निरीक्षण केले असता लक्षात येते की त्या काळात आपले शारीरिक सौंदर्य खुलविण्यासाठी स्त्री-पुरुष लैंगिक अवयवांजवळचे केस काढून टाकीत असत. 18 व्या शतकात सायबेरियात गुप्तांगाजवळील केस सैतानाचे प्रतिक मानले जात. हा एक गुन्हा देखील समजला जाई आणि यामुळे पती-पत्नीत घटस्फोट देखील होत असे. तसेच त्या व्यक्तीला गुन्हेगार मानून गावाबाहेर काढले जाई. जपानमध्ये याच्या उलटे होते. तेथे केसविरहीत स्त्रीला वांझोटी समजले जाई. पुरुष अशा स्त्रियांकडे आकर्षित देखील होत नसत. ज्या स्त्रिया निसर्गत केसविहीन असत त्या कृत्रिम केसांचा वापर करीत आणि पकडले गेल्यावर दंड भरीत असत. आजकाल अमेरिकेतील स्त्रिया आपले गुप्तांग सजवण्यावर बारकाईने लक्ष देतात. यासाठी त्या भरपूर वेळ आणि पैसा खर्च करतात. तेथील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत ब्यूटी पार्लर्समध्ये या कामाला ‘गोल्डन जॉब’ म्हटले जाते. उदा. स्त्री गुप्तांगाजवळील प्रत्येक केसाला स्फटिक कण लावून येते. त्याचा परिणाम असा होतो की, सहवासा दरम्यान जेव्हा स्त्री निर्वस्त्र होते तेव्हा तो भाग लहान तारकापुंजांनी झळाळलेला दिसून येतो. या कामासाठी बारा ते सोळा तास लागतात तसेच आठ ते दहा हजार डॉलर खर्च येतो. या व्यतिरिक्तही अनेक प्र्रकारचे ‘गोल्डन जॉब’ असतात. गुप्तांगाजवळील केस साफ करुन त्याठिकाणी ग्राहकाच्या पसंतीनुसार चित्रे गोंदली जातात. केसांना रंगांनी रंगविले जाते. केसांना कापून त्यांना दिल, तारका तसेच अन्य आकार दिले जातात. ‘वैलेंटाइन डे’ च्या निमित्ताने अमेरिकेतील प्रसाधन केंद्रात अशा गोष्टी करवून घेण्यासाठी ग्राहकांची इतकी रांग लागते की, दहा-पंधरा दिवसांपूर्वी आगाऊ आरक्षण करावे लागते. ग्राहकांच्या यादीवर नजर टाकण्यास अमेरिकी सेक्सच्या बाबतीत किती उत्साही आणि जागरुक आहेत हे लक्षात येते. यात 80 वर्षांच्या वृद्ध महिलादेखील सामील असतात. ‘गोल्डन जॉब’ मध्ये तज्ञ मानल्या जाणाऱया सौंदर्यतज्ञ हेलन स्मिथच्या म्हणण्यानुसार तिने ही कल्पना मेक्सिकन जमातींमधून उचलली. अशा प्रकारचे ‘गोल्डन जॉब’ वेगवेगळ्या प्रकारे जगातील अनेक ठिकाणी चालतात. प्राचीन रशियातील सुंदर तरुणी मिलनापूर्वी आपले गुप्तांगाजवळील केस मेंदीने रंगवीत असत तसेच त्यांना अत्तर आणि इतर वस्तू लावून सुवासिक बनवीत असत. पापुआ न्यू गिनी येथील कबिल्यातील स्त्रिया आपल्या गुप्तांगाजवळील केस गडद लाल रंगाने रंगवीत असत. टर्कीतील स्त्रिया चंदन, मोरोक्कोतील गुलाबपाणी आणि इराणमधील स्त्रिया कस्तुरीचा वापर करुन आपला गुप्तभाग सुगंधित करीत असत. दक्षिण भारतातील तसेच श्रीलंकेतील काही भागातील स्त्रिया सहवासापूर्वी लोबानचा धूर करुन त्यावर गुडघ्यात बसून आपले गुप्तांग सुगंधित करीत. काही समजात गुप्तांगाजवळील केसांना सैतानाचे प्रतीक मानले गेले आहे, तर काही समाजात त्यांच्यात चिकित्सकीय आणि अध्यात्मिक उपायांचे गुण असतात असे मानले गेले आहे. इंडोनेशिया येथील आरु बेटावरील रहिवासी आजदेखील आजारांपासून वाचण्यासाठी आपल्या गुप्तांगाजवळील केसांपासून बनविलेला ताईत वापरतात. सोळाव्या शतकातील युरोपीय डॉक्टर हे केस जाळून त्यापासून जखमींवर उपचार करत असत. मक्कन बेटावरील स्त्रिया आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून आपल्या प्रेमीला आपल्या गुप्तांगाजवळील केस भेट म्हणून देत असत. ही भेट देण्यामागे त्यांचा असा विश्वास होता की याच्या जादुई गुणांमुळे त्यांचे प्रेमी दुसऱ्या स्त्रियांकडे आकर्षित होणार नाहीत. अमेरिकी लैंगिक तज्ञ डॉ. निकोलकेज यांचे म्हणणे आहे की आपला प्रेमी किंवा प्रेमिका यांच्या हाताने गुप्तांगाजवळील केस काढण्याची क्रिया अशा लैंगिक सुखाचा अनुभव देते जी खरोखरच लाजवाब आहे. याचाच अर्थ असा की ऑस्ट्रेलियाच्या मूळ रहिवाशांनी मिलनाच्या रात्री स्त्री-पुरुषांनी एकमेकांच्या गुप्तांगाजवळील केस काढण्याची परंपरा बऱयाच प्रयोगानंतर आणि अभ्यासानंतर चालू केली होती. ब्रिटीश सौंदर्यतज्ञ मार्लिन एडकॉफ म्हणते, ‘गुप्तांगाजवळील केस काढणे म्हणजे आपण तरुण आहोत हे जाहीर करण्याचा खास प्रकार आहे.’ कदाचित म्हणूनच पाश्चात्य देशातील वृद्ध महिला आपण तरुण आहोत हे जाहीर करण्यासाठी असे करतात. काही भारतीय समाजात नथ ही स्त्रियांच्या कौमार्याची प्रतीक समजली जाते. स्त्रिच्या नाकात नथ नसेल तर ती कुमारी नाही असे समजले जाई. या परंपरेचा व्यावसायिक लाभ अवधच्या वेश्यांनी उठवला. त्यांनी कुमारी वेश्यांच्या नथ उतरवण्याच्या परंपरेला इतके चकचकीत स्वरुप दिले की श्रीमंतांमध्ये एखाद्या वेश्येची नथ उतरवण्यासाठी चढाओढ लागते. या चढाओढीत जिंकण्यासाठी काही जहागीरदार, जमीनदार यांनी आपल्या जमिनी विकून टाकल्या. सेक्स आणि सौंदर्य यांचा संबंध वेगवेगळ्या समाजात वेगवेगळा राहिला आहे. इंग्रजांनी आपल्यावर तब्बल एक शतक राज्य केल्यामुळे आपला आजही असा समज आहे की गोरा रंग सर्वात सुंदर आणि सेक्सी असतो. पण या जगात काही असेही लोक आहेत की जे काळ्या-सावळ्या रंगाचे शौकीन आहेत. आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा फक्त गोऱया मुलींनीच नाही तर काळ्या रंगाच्या मुलींनीही जिंकल्या आहेत. आफ्रिकेत काही असे भाग आहेत की ज्या भागात घरात गोरी मुलगी जन्माला आली तर तिथे भविष्य अंधकारमय आहे असे मानतात. सुंदर तरुणीचा चेहरा, कंबर आणि उरोजांवर कविता लिहिणारे पुष्कळ आहेत पण 18 व्या शतकातील हैदराबादी आणि लखनवी धनिक सेक्स आणि सौंदर्याच्या प्रतिकांचा कोठे कोठे शोध घेत असत. त्या काळातील रसिकांमध्ये बेंबीपासून निघणाऱया केसांच्या तलम रांगेला सर्वात सेक्सी मानले जाई. त्या काळातील लखनऊचा शायर ‘मदहोश’ लिहितो की तेथील नवाब या केसांचे इतके शौकीन होते की कोणा सुंदरीची निवड करताना या गोष्टीकडे खास लक्ष देत असत. शेवटी काय तर आवड आपली आपली. कोणासाठी सेक्स फक्त घटकाभराची मजा आणि आयुष्यभराची सजा आहे, तर कोणासाठी आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण. अशी गोष्ट ज्यावर हजारो पुस्तके लिहिली गेली आहेत आणि लिहिली जातील. तरीही लोक म्हणतील ‘ये दिल मांगे मोअर!’


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL